149 जणांचे अहवाल निगेटिव्ह; 62 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल : जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या 166
स्थैर्य, सातारा दि. 20 : काल दि. 19 मे रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार सातारा जिल्ह्यात मुंबई, ठाणे व इतर भागातून प्रवास करुन आलेले सातारा तालुक्यातील वारणानगर ता (लोधडवडे) येथील 3, वर्णे येथील 1, रायगांव पोखरी येथील 1, कोरेगाव तालुक्यातील न्हावी येथील 1 व वेळू येथील 1, खंडाळा तालुक्यातील अहिरे 1 व अजनुज गावातील 1, जावली तालुक्यातील वरोशी गावातील 1, खटाव तालुक्यातील मायणी येथील 1, आवळे पठार, डिस्क्ळ येथील 1, पाटण तालुक्यातील बनपुरी येथील 1, शिराळा येथील 1, कराड तालुक्यातील म्हासोली येथील 4, खामकरवाडी चरेगाव येथील 1 व शामगाव येथील 1, असे एकूण 20 नागरिकांचे अहवाल कोविड-19 बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये 19 ते 70 वर्षे वयोगटातील 15 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे.
उपरोक्त अहवालात वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे घेण्यात आलेल्या 43 वर्षीय मृत महिलेचा अहवाल कोविड-19 बाधित आला आहे. उर्वरित 19 पैकी 4 जणांना मध्यम स्वरुपाची तर 15 जणांना लक्षणे विरहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत.
149 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 37, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 55, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 11 व कोरेगाव येथील 15 असे एकूण 129 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील 20 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे त्यांनी कळविले आहे. असे एकूण 149 नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
62 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
दि.19 मे रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 10, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 52 असे एकूण 62 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 166 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 73 आहे तर मृत्यु झालेले 3 रुग्ण आहेत.