जिल्ह्यातील 89 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित, दोन बाधिताचा मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 15 : काल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 80, प्रवास करुन आलेले 6, गरोदर माता 2 आणि सारी बाधित 1 असे एकूण 89 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे

जावली तालुक्यातील सायगाव येथील 46 आणि 22 वर्षीय महिला, 20, 19 आणि 20 वर्षीय पुरुष, तेटली येथील 56 आणि 22 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, आणेवाडी येथील 20 वर्षीय पुरुष.

कोरेगाव तालुक्यातील अनपटवाडी येथील 55 वर्षीय पुरुष

सातारा तालुक्यातील सातारा शहरातील : मार्केट यार्ड येथील 25 वर्षीय महिला (सारी), राधिका रोड येथील 30, 58 आणि 22 वर्षीय महिला, कण्हेर येथील 47 आणि 14 वर्षीय पुरुष, 37 आणि 65 वर्षीय महिला, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष,  पाटखळमाथा येथील 46 पुरुष, जिहे येथील 60, 15 आणि 82 वर्षीय पुरुष, 60 आणि 23 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 14, 16 वर्षीय महिला, 15 वर्षीय पुरुष.

वाई तालुक्यातील नवचेवाडी येथील 57, 32 आणि 28 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 57, 30 आणि 4 वर्षीय महिला, 33 वर्षीय पुरुष, धर्मपुरी येथील 35 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 38 वर्षीय महिला, चिखली येथील 35 वर्षीय पुरुष, वाई येथील 36, 50 आणि 59 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 80 वर्षीय पुरुष,

कराड तालुक्यातील चचेगाव येथील 42 वर्षीय महिला, करवडी येथील 28 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, बेलवडी हवेली येथील 31 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 25 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 26 वर्षीय डॉक्टर, वहागाव येथील 30 वर्षीय पुरुष (कराड पोलिस).

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 28, 32, 29 आणि 53 वर्षीय पुरुष, 30, 65, 37, 15 आणि 17 वर्षीय महिला, हरळी येथील 49 वर्षीय महिला, घाटदरे येथील 29 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 14 वर्षीय पुरुष, 30 आणि 55 वर्षीय महिला, खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष.

खटाव तालुक्यातील विकले येथील 47 वर्षीय पुरुष, उफळे येथील 45 वर्षीय पुरुष, वडूज येथील 6, 9 आणि 38 वर्षीय महिला.

माण तालुक्यातील म्हसवड येथील 28 वर्षीय महिला डॉक्टर, दहिवडी येथील 35 आणि19 वर्षीय महिला, 16 वर्षीय पुरुष, आंधळी येथील 30 वर्षीय पुरुष.

फलटण तालुक्यातील फलटण शहरातील बुधवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, सरडे येथील 4 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 33, 18 आणि 52 वर्षीय महिला, 14 वर्षीय पुरुष.

महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 35 वर्षीय पुरुष.

पाटण तालुक्यातील मीरगाव येथील 65 वर्षीय महिला, 44 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 60 वर्षीय महिला, नारळवाडी येथील 20 वर्षीय महिला.

दोन बाधिताचा मृत्यु

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे परखंदी ता. वाई येथील 80 वर्षीय कोरोना बाधित असलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. कोरोना संशयित म्हणून त्याचा उपचारावेळी घेण्यात आलेला नमुना कोरोना बाधित असल्याचा रिपोर्ट काल रात्री उशिरा प्राप्त झाला.

तसेच सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे म्हसवड ता. माण येथील 58 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!