जिल्ह्यात 26 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह : दिवसभरात एकूण ३० पॉझिटिव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


केळघर (तेटली) येथील रुग्णाच्या मृत्यु पश्चात रिपोर्ट आला पॉझिटिव्ह : एकूण बाधित रुग्ण संख्या 452

स्थैर्य, सातारा दि. 28 : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर आणि उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 26 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जावळी तालुक्यातील केळघर ( तेटली ) येथील मुंबई वरून आलेल्या चार वर्षे आजारी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू 26 मे रोजी झाला होता, मृत्यू पश्चात त्याचे स्त्राव तपासणीसाठी घेतले होते ते आजच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

या बाधित रुग्णांमध्ये पाटण तालुक्यातील सळवे येथील 1, सदूवरपेवाडी येथील 1, करपेवाडी येथील  1,  गलमेवाडी येथील 1,  घनबी येथील 1,  कराड तालुक्यातील म्हासोली येथील 8, वानरवाडी येथील3, भरेवाडी येथील 1, फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथील 1, वाई तालुक्यातील जांभळी येथील 6, जावळी तालुक्यातील आपटी येथील1 , व केळघर (तेटली ) येथील 1 (मृत)

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील  एकूण संख्या 452, उपचार घेत असलेले 302, कोरोना मुक्त 134 आणि मृत्यू 16 झाले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!