रेमडिसिवर इंजेक्शनच्या काळा बाजार करणार्‍यांची तक्रार तत्काळ फलटण पोलिसांना द्यावी; पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांचे आवाहन


स्थैर्य, फलटण दि. ११ : येथील सुविधा हॉस्पिटलमधील वार्ड बॉयसह अन्य तीघा जणांना ‘रेमडिसिवर इंजेक्शन’ची चढ्या भावाने विक्री करत असल्याप्रकरणी अटक केल्यानंतर चौकशीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी संबंधीत सातारा जिल्ह्यातील आणखी दोघांना औषध प्रशासन विभागाच्या सहकार्याने अटक करण्यात फलटण शहर पोलीसांना यश आले आहे. नव्याने अटक केलेल्या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका मेडिकल दुकानदाराचे व त्याच्या भावाचे नाव पुढे आले असून त्यादृष्टीने तपास सुरु आहे, अशी माहिती फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी दिली. रेमडिसिवर इंजेक्शनच्या काळा बाजार करणार्‍यांविरोधात कुणाला तक्रार करायची असल्यास त्यांनी तात्काळ फलटण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवले जाईल, असेही आवाहन फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी केले आहे.

फलटणमधील ‘रेमडिसिवर काळा बाजार’; आणखी दोघांना अटक; आता मेडिकल दुकानदार पोलीसांच्या रडारवर ?


Back to top button
Don`t copy text!