दैनिक स्थैर्य । दि. २६ ऑक्टोबर २०२२ । आटपाडी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर बेछुट टीका – टीपन्नी करणाऱ्यांना राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकारी, युवकांनी जशास तसे उत्तर देवून ही विकृती मोडून काढावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे सचिव आणि खानापूर आटपाडी तालुक्याचे पक्ष निरीक्षक ताजुद्दीन तांबोळी यांनी केले आहे .
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते . अध्यक्षस्थानी खानापूर आटपाडी मतदार संघाचे अध्यक्ष आणि पलुस कडेगांवचे पक्ष निरीक्षक सुशांत देवकर हे होते . यावेळी या दोघांचा रावसाहेबकाका पाटील, विष्णुपंत चव्हाण – पाटील, आनंदरावबापू पाटील, हणमंतराव देशमुख यांचे हस्ते सत्कार करणेत आला .
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील, ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक, राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण पाटील, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज पाटील, महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कासार अष्टेकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या विचारधारेवर आणि श्री शरदचंद्रजी पवार साहेब जयंतराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य माणुस शेतकरी, कष्टकरी, दलित,अल्पसंख्याक, महिला, ओबीसी सह सर्व बहुजन समाजा साठीच मोठे काम केले आहे. हा इतिहास आहे . पक्षाने राज्यभर केलेले प्रचंड काम जनतेपर्यत पोहचविण्यात आपण यशस्वी झाल्यास या खानापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी होईल. पक्षाच्या पदाधिकाऱ्यासह, विशेषत : तरुणांनी नेहमी सतर्क राहीले पाहीजे . आपल्या आक्रमक भूमिकेतून प्रत्येकाला राज्यभर चमकण्याची संधी उपलब्ध होवू शकते . त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. प्रत्येक महिन्याला आढावा बैठकीच्या माध्यमातून सर्वांच्या कामाचा लेखा जोखा श्रेष्टीपुढे मांडून निष्ठावंत, क्रियाशील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी आग्रही राहणार आहे, असे ही ताजुद्दीन तांबोळी यांनी यावेळी स्पष्ट करून ४ – ५ दशके निष्ठेने काम करणाऱ्यांचे पक्षाने चीज करावे असा आपला नेत्यांकडे आग्रह राहणार असल्याचे त्यांनी सांगीतले .
आटपाडी – खानापूर तालुक्या सारख्या उपेक्षित तालुक्यातील प्रत्येक गावात एकादे दुसरे विकास कार्य उभे राहण्यासाठी राष्ट्रवादी च्या विधानपरिषद, राज्यसभेच्या, सदस्यांच्या आमदार – खासदार फंडाच्या निधीचा वापर व्हावा यासाठी आपण श्रेष्टीकडे आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट करून खानापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रबळ करण्यासाठी सदाशिवराव भाऊ पाटील अॅड बाबासाहेब मुळीक यांच्या मार्गदर्शना खाली मी आणि ताजुद्दीन तांबोळी निकराचे प्रयत्न करणार असल्याचेही सुशांत देवकर यांनी यावेळी स्पष्ट केले .
आपल्या स्वागत प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत निष्ठेने काम करणाऱ्यांना सर्वत्र प्राधान्य दिले जाण्याची भावना बोलून दाखविली . पक्षासाठी दिवस रात्र राबणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याची दखल राज्य – राष्ट्रीय स्तरावरील श्रेष्ठींनी घ्यावी. असे मत ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील यांनी व्यक्त केले.
सत्तेत असताना आमदार, मंत्री म्हणून आणि विरोधात असताना विरोधी आमदार म्हणून जयंतराव पाटील हेच दुष्काळग्रस्तांसाठी सदैव झगडले आहेत. टेंभू, म्हैशाळ सारख्या अनेक पाणी योजना त्यांच्यामुळेच मार्गी लागल्या आहेत . सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वंचित ११७ गावांना पाणी उपलब्ध करून देण्यात जयंतराव पाटील साहेब यशस्वी झाल्याचा दुष्काळ ग्रस्ताना मोठा अभिमान आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मजबुती येईपर्यत आमदार जयंतराव पाटील यांनी या मतदार संघाचे पालकत्व स्विकारावे . माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांनी प्रत्येक महिन्याला सर्वांशी समन्वय साधावा . आटपाडी कबरस्थान मधील सभा मंडपासाठी जयंतराव पाटील यांच्यामुळेच खासदार फौजिया खान यांच्या खासदार फंडातून २५ लाख रुपये उपलब्ध झाल्याचे यावेळी सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
प्रत्येकाने आप आपसातील मणभेद संपविल्यास अनेक पदे, सत्तास्थाने आपल्या पर्यत चालून येतील अशी भूमिका ज्येष्ट नेते विष्णुपंत चव्हाण पाटील यांनी मांडली .
गुरुवार दि २५ रोजी संपन्न होणाऱ्या , राष्ट्रीय नेते शरद पवार, माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील शेतकऱ्यांच्या अभ्यास मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आनंदरावबापू पाटील यांनी यावेळी केले .
यावेळी युवकचे प्रदेश सचिव प्रा . एन .पी . खरजे, तालुका महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कासार अष्टेकर, तालुका युवक अध्यक्ष सुरज पाटील, विट्याचे संतोष गायकवाड, घाणंदचे सरपंच परशुराम सरक इत्यादींची भाषणे झाली. किशोर गायकवाड , मनोज भोसले , प्रभाकर नांगरे , अतुल जावीर, जालींदर कटरे, दत्ता यमगर , राजेंद्र सावंत, प्रा . संताजी देशमुख, पी . एल . देशमुख, नितीन डांगे, विनोद बनसोडे, विश्वतेज देशमुख, अक्षय मोरे, बाळासाहेब निचळ, शहाजी भिसे,दत्ता रावळ, धुळा ठेंगले शरद सोन्नुर, ज्ञानु घुटुगडे, इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी समाधान भोसले यांनी आभार मानले .