
दैनिक स्थैर्य । दि. १२ मार्च २०२२ । फलटण । सातारा वनविगातील फलटण वनपरिक्षेत्राच्या वतीने आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गामध्ये जाणार्या सात वडाच्या झाडांचे यशस्वीरित्या पुनर्रोपण करण्यात आलेले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. तरी या महामार्गामध्ये काही जुनी झाडे जाण्याचे निदर्शनास आले. त्या नंतर फलटण वनपरिक्षेत्र, WLPRS संस्था, निसर्ग सोबती संस्था, लायन्स कल्ब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी ते पंढरपुर पालखी महामार्गाअंतर्गत येणाऱ्या वृक्षप्रजाती पैकी ‘वड’ या प्रजातीची एकूण सात झाडे यंत्राच्या सहाय्याने मुळासह काढुन ते वाहनाने फलटण नियतक्षेत्रातील वनक्षेत्रामध्ये नागरी क्षेत्रात ‘वड’ या प्रजातीची पुनर्ररोपन करणेत आले.
सदर कार्यक्रमासाठी सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एम. एन. मोहीते, सहाय्यक वनसंरक्षक आर. एस. व्होरकाटे यांचे मार्गदर्शन लाभले.
फलटण येथील वनवनक्षेत्रपाल एम. यु. निकम यांच्यासोबत फलटण विभागातील अधिकारीव सर्व कर्मचार्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.