स्थैर्य, फलटण दि.१९: फलटण शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून सदर रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी या मागणीचे निवेदन, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांच्या नेतृत्त्वाखाली, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा समन्वयक महेंद्र सुर्यवंशी – बेडके यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना देण्यात आले.
यावेळी पंकज पवार, अमिरभाई शेख, सिद्धार्थ दैठणकर, शरद सोनवणे, सुनील गायकवाड, प्रितम जगदाळे, अशोक शिंदे, विजयकुमार भोसले, शंकरराव लोखंडे, एल.जी.बेंद्रे,अतुल कांबळे, मोहित बार्शीकर, सोपान जाधव उपस्थित होते.
दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसच्या मागणीचा प्राधान्याने विचार करून ज्याठिकाणी भुयारी मलनिस्सारण वाहिन्याची कामे पूर्ण झाली आहेत त्याभागात रस्त्याची कामे पाऊसकाळ थांबताच चालू केली जातील असे आश्वासन यावेळी प्रसाद काटकर यांनी दिले.