रामराजेंच्या आदेशाने फलटण – दहिवडी रस्त्याची डागडुजी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० डिसेंबर २०२२ । फलटण । तीन महिन्यांपुर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नवीन राष्ट्रीय मार्गावरील फलटण – दहिवडी (माण) या दोन तालुक्यांदरम्यान झिरपवाडी – भाडळी – दुधेबावी या गावांच्या हद्दीमधील रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने होण्याची मागणी केली होती त्यानुसार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण ते दहिवडी रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात आली आहे.

त्यामुळे या रस्त्यावरुन वाहणारी अवजड वाहने, प्रवासी वाहतुक, शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत होती. या परिसरातील दुधेबावी, सासकल, भाडळी खु, भाडळी बु, तिरकवाडी, झिरपवाडीसह वाडीवस्तीवरील शेतमाल, ऊसवाहतुक, दुग्धवाहतुक फलटण बाजारपेठेत होत असते. दरम्यान या रस्त्यावर अनेक अपघात झाले होते. यामध्ये दोन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. कित्येक जणांना दुखापतीला सामोरे जावे लागले होते.

या परिस्थितीचे गांभीर्य आणि परिसरातील लोकांची मागणी लक्षात घेऊन आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे माजी संचालक महादेव गुंजवटे, महादेव सोनवलकर, मोहनराव डांगे यांनी विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कडे सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने होण्याची मागणी केली होती.
यासंबंधी श्रीमंत रामराजे यांनी लक्ष घालुन कार्यकारी अभियंता, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण वारजे, पुणे यांना पत्र देऊन तात्काळ रस्ता दुरुस्त होण्यासंबंधी सुचना केली होती. या सुचनेनंतर संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याची पाहणी केली. त्यांचेकडुन मोठमोठे खड्डे आणि चरी पडलेल्या ठिकाणी खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले.

अतिशय खराब अवस्थेतील रस्त्यावरील डागडुजी संबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण चे अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असुन परिसरातील लोकांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना विशेष धन्यवाद दिल्याचे मातोश्री विकास सेवा सोसायटीचे चेअरमन मोहनराव डांगे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!