शंकर मार्केट–शुक्रवार पेठेतील प्रसिध्द डॉक्टर डॉ. सुहास म्हेत्रे यांचे निधन


फलटण शहरातील प्रसिध्द वैद्यकीय सेवक डॉ. सुहास रामचंद्र म्हेत्रे यांचे दीर्घ आजाराने पुणे येथे निधन. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ.

स्थैर्य, फलटण, दि. १० फेब्रुवारी : फलटण येथील शंकर मार्केट व शुक्रवार पेठ परिसरात वैद्यकीय सेवेसाठी प्रसिध्द असलेले डॉ. सुहास रामचंद्र म्हेत्रे यांचे दीर्घ आजाराने उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने फलटण शहरातील वैद्यकीय, सामाजिक आणि व्यापारी वर्तुळात तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ. म्हेत्रे हे रुग्णांशी आपुलकीने वागणारे, शांत स्वभावाचे आणि सेवाभावी वृत्तीचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. शंकर मार्केट व शुक्रवार पेठ परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आधारवड ठरले होते. अनेक वर्षे त्यांनी फलटणकरांच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःला झोकून दिले होते.

त्यांच्या निधनाची बातमी समजताच रुग्ण, सहकारी डॉक्टर, व्यापारी वर्ग तसेच नागरिकांनी तीव्र दुःख व्यक्त केले. फलटण शहराने एक संवेदनशील व कर्तव्यनिष्ठ डॉक्टर गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!