स्थैर्य, सातारा दि. २३: सातारा येथील हुतात्मा स्मारकाच्या आवाराशेजारी असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने असलेल्या चौकातील आयलंडवर झाडेझुडपे वाढलेल्याने अस्वच्छता तिथे दिसत आहे ती सातारा नगरपालिका अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छ करावी अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे
आझाद हिंद सेनेचे नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त सातारा शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने अभिवादन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कॉम्रेड सयाजीराव पाटील अच्युतराव जाधव , विजय मांडके यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला
नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाच्या आयलंडवर झाडेझुडपे नेताजींच्या जयंती दिनी ही दिसली. नेताजींच्या जयंतीच्या दिनी ही तेथे स्वच्छता करण्यात आलेली नव्हती त्यामुळे सातारा नगरपालिकेने येत्या महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी तरी स्वच्छता करावी अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा शाखेच्या वतीने करण्यात आलेली आहे
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महेश गुरव , संकेत माने पाटील ,शुभम ढाले, रोहित क्षिरसागर हर्षदा पिंपळे, सिद्धी तिखे, सुजाता शेळके आदी उपस्थित होते.