दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२२ | फलटण | कोरोना या वैश्विक महामारीमध्ये फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये आशा व अंगणवाडी सेविकांनी अतिशय उल्लेखनीय असे काम केलेले आहे. कोरोना पुन्हा येऊच नये. परंतु जरी कोरोना पुन्हा आला तरी सर्व आशा व अंगणवाडी सेविका पूर्ण ताकतीने कार्यरत राहतील असा विश्वास फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी व्यक्त केला.
फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ऑक्सफाम इंडिया व क्रांतीसुर्य प्रतिष्ठान यांच्यामार्फत आयोजित कार्यक्रमामध्ये गटविकास अधिकारी सौ. गावडे बोलत होत्या. या वेळी ऑक्सफाम इंडियाचे पद्मसिंह पाटील, क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे मिलिंद नेवसे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
ऑक्सफाम इंडिया मार्फत देण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटमध्ये दररोजच्या वापरा मधील बर्याचशा वस्तू आहेत तरी आशा वर्कर्स तपासणीच्या वेळी जाताना त्या वस्तूंचा वापर करावा व आपलेही आरोग्य वाचवण्या सोबतच समोरच्या ही व्यक्तीचे तपासणी योग्य तयारी त्या करावी व गरज असल्यास पुढील ट्रीटमेंटसाठी त्यांना उपकेंद्रकडे पाठवण्याची व्यवस्था करावी असेही यावेळी डॉ. सौ. अमिता गावडे पवार यांनी मत यावेळी व्यक्त केले.
ऑक्सफाम इंडिया व क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून फलटण तालुक्यात सह सातारा जिल्ह्यामधील आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. कोरोना काळात सुद्धा क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले होते. आगामी काळात सुद्धा क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी यावेळी दिली.
ऑक्सफाम इंडिया संपूर्ण जगामध्ये माती व पाण्याचा विविध क्षेत्रांमध्ये काम करत आहे. कोरोना काळापासून ऑक्सफाम इंडियाने आरोग्य क्षेत्रामध्ये सुद्धा काम करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आशा वर्कर्सना देण्यात येणार्या किटचा रोजच्या कामामध्ये नक्कीच लाभ होईल, अशी ग्वाही यावेळी समन्वयक पद्मसिंह पाटील यांनी यावेळी दिली.