
दहिवडी – पारितोषिक वितरण प्रसंगी मुधोजी हायस्कूलचे खेळाडू व मान्यवर.
स्थैर्य, फलटण, दि. 9 नोव्हेंबर : दहिवडी येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ , विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाच्या व्हॉलीबॉल संघाने उपविजेतेपद प्राप्त केले.
या संघामध्ये हर्षल मदने, पियुष फडतरे, कुणाल भोसले, अथर्व फडतरे, हरीश जाधव, सुशील कुलकर्णी, शिवराज भोईटे, विनय शिंदे, कुणाल बिचुकले, चिनमय पारिख, चैतन्य पारिख, अर्श तांबोळी हे खेळाडू संघात सहभागी झाले होते.
या यशाबद्दल यशस्वी खेळाडूंचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, क्रीडा समितीचे चेअरमन शिवाजीराव घोरपडे, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच.कदम यांनी अभिनंदन केले.

