
स्थैर्य, सातारा, दि.२९: जिल्ह्यातील रेमडेसिव्हर औषधाचा मोठासाठा क्वॉलिटी चेकींगमध्ये रिजेक्ट
झाल्याने मागील काही दिवसांमध्ये राज्यात औषधाची कमतरता भासत होती.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील व मी स्वत: याबाबत जातीनं लक्ष घालून येत्या
एक – दोन दिवसांत रेमडेसिव्हर औषध कसे लवकरात लवकर उपलब्ध होतील याकडे लक्ष
देणार आहोत. तसेच भविष्यकाळातही या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करुन
घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.