एक जानेवारीपासून नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि. 3१:  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबईच्या अधिनस्त विभागीय माहिती कार्यालय नाशिक अश्विनी बॅरेक्स कक्ष क्र. 5 ते 8 छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रासमोर, नाशिक रोड नाशिक येथे कार्यरत होते. हे कार्यालय मीडिया सेंटर बी.डी.भालेकर मैदान, महाकवी कालिदास कलामंदिर समोरील महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित झाले आहे. 1 जानेवारी 2021 पासून विभागीय माहिती कार्यालयाचे कामकाज नियमित सुरु होणार असल्याची माहिती, विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक रणजितसिंह राजपूत यांनी दिली आहे.

नाशिक रोड येथे कार्यरत असणारे विभागीय माहिती कार्यालयाची जागा महसूल प्रबोधिनी तथा विभागीय प्रशिक्षण संस्थेच्या संकुलासाठी आरक्षित करुन देण्यात आली आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड परिसरातील विभागीय माहिती कार्यालयाची जागा रिक्त करावी ,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले होते. त्यामुळे विभागीय माहिती कार्यालय हे मीडिया सेंटर, बी.डी.भालेकर मैदानावरील इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे.

नाशिक विभागीय माहिती कार्यालयामार्फत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत शासकीय प्रसिध्दी व संनियंत्रण केले जाते. या कार्यालयाशी कामकाज असलेल्या सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन श्री. राजपूत यांनी केले आहे.

भविष्यात या कार्यालयाशी संबंधित असलेला पत्रव्यवहार व संपर्क विभागीय माहिती कार्यालय, बी.डी. भालेकर मैदान,महाकवी कालिदास कलामंदिर समोर, नाशिक, 422001 या नवीन पत्त्यावर करावा. तसेच या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकात बदल झाले असून नवीन दूरध्वनी क्रमांक (0253) 2590956, 2590412, 2590969 असे आहेत. बदल झालेल्या नवीन दूरध्वनी क्रमांकाची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही श्री.राजपूत यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!