
दैनिक स्थैर्य | दि. 20 फेब्रुवारी 2025 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी नगरसेवक अनुप शहा यांनी अष्टविनायकाच्या पैकी ५ गणपती व भीमाशंकर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील धार्मिक यात्रा हि प्रभाग क्र. १० व ११ मधील २०० महिलांसाठी आयोजित केली असल्याची माहिती अनुप शहा यांनी दिली.
सदरील यात्रा हि शनिवार दि. २२ रोजी फलटणवरून मोरगाव – रांजणगाव – ओझर – लेण्याद्री – भीमाशंकर – थेऊरमार्गे फलटण येथे पुन्हा पूर्ण होणार आहे.