
स्थैर्य, वडले, दि. ४ ऑक्टोबर : येथील काळवेवस्तीमधील संत सद्गुरू देवालय, संत बाळूमामा पालखी विसावा व मेंढी माऊली समाधी मंदिरात आज, शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत सद्गुरू बाळूमामा सेवेकरी पंचक्रोशी, वडले यांनी या धर्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमानिमित्त अकलूज येथील ज्ञानई गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश महाराज सुळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. आज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत गजीनृत्य होणार असून, दुपारी २ ते ४ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी ४.१५ वाजता फुलांचा कार्यक्रम, आरती आणि पाळणा होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी या भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.