महारेराकडून व्यावसायिकांना दिलासा; बिल्डर्स असोसिएशनच्या पाठपुराव्यास यश : चेअरमन रणधीर भोईटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२१ । फलटण । नुकतीच महारेराने राज्यातील प्रलंबीत प्रकल्पांची यादी जाहीर केलेली होती. या यादीनुसार एकुण नोंदणीकृत ३०६६८ प्रकल्पांपैकी ७२१४ प्रकल्प पुर्ण झालेले आहेत. ३३७१ प्रकल्पांची मुदत संपुन देखील मुदतवाढीसाठी विकसकांनी अर्ज केले नव्हते. दिरंगाईमूळे उपभोक्ता दाखला वेळीच मिळत नसल्यामूळे बरेचसे प्रकल्प पुर्ण होऊन देखील प्रपत्र ४ न दिल्यामुळे अपुर्ण दिसत असलेचे बिल्डर्स असोसिएशनने महारेरास निदर्शनास आणून दिलेले होते. कोरोनाच्या महामारीमुळे अनेक विलंब होत असलेने, महारेराने जे विकसक प्रामाणिकपणे काम करत आहेत, त्यांना दिलासा दिलेला आहे. या बाबत बिल्डर्स असोसिएशने सत्यताने पाठपुरावा केल्यानेच महारेराकडून व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून बिल्डर्स असोसिएशनच्या पाठपुराव्यास यश प्राप्त झालेले आहे, अशी माहिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

याबाबत बोलताना रणधीर भोईटे म्हणाले कि, बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने महारेराचे अभिनंदन व आभार मानण्यात आलेले आहेत. वाढीव मुदतीत ज्यांनी उपभोक्ता प्रमाणपत्र घेऊन फॉर्म -४ दिला आहे. मुदत संपलेनंतर उपभोक्ता प्रमाणपत्र मिळेपर्यंत घरांची विक्री केली नसलेल्या प्रकल्पांना याचा थेट लाभ होणार आहे. याप्रमाणे मुदत संपून देखील अर्ज न करणारे, अंशता उपभोक्ता दाखला मिळालेले प्रकल्प, ५१ टक्के ग्राहकांच्या संमतीने मुदत वाढवून घेऊ शकतात. सकारात्मक घेतलेल्या या निर्णयाचा लाभ अनेक विकसक घेतील व यामुळे प्रकल्प बंद पडून ग्राहकांना त्रास सहन करावा लागणार नाही व जे प्रकल्प कागदोपत्री किंवा प्रत्यक्ष अपूर्ण दर्शवत आहेत त्यांना ग्राहकांच्या परवानगीने प्रकल्प पूर्ण करता येतील, असा व्यवहारीक दृष्टीकोन बाळगून घेतलेल्या या निर्णयाचे बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने स्वागत केले आहे.

या बैठकीमध्ये महारेरा सचिव वसंत प्रभु यांचेबरोबर आदेश क्र. २४ व विविध प्रपत्रावर चर्चा करणेत आली. बांधकाम व्यवसायिक सदस्यांना याबाबत काही अडचण आल्यास त्यांनी बिल्डर्स असोसिएशनकडे संपर्क करावा असे अवाहन चेअरमन रणधीर भोईटे यांनी केले.

यावेळी महारेराचे अधिकारी व बिल्डर्स असोसिएशनचे रेरा चेअरमन डॉ. आनंद गुप्ता, मोहिंदर रिजवाणी, शफिक मोदी, मधुसुदनराव हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!