
दैनिक स्थैर्य । 31 मे 2025। फलटण । राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील हे आज दि. ३१ मे रोजी फलटण शहरासह तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी दिली.
याबाबत अधिक बोलताना श्रीमंत शिवरुपराजे म्हणाले की, मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील हे फलटण तालुक्यातील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी फलटण दौर्यावर येणार आहेत. आज दि. ३१ मे रोजी दुपारी 3 वाजुन 30 मिनिटांनी सुरवडी येथुन दौर्याची सुरवात होणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने सर्वाधिक नुकसान हे फलटण तालुक्यात झाले आहे. त्याची पाहणी करुन शासनाच्यावतीने तातडीने मदत मिळवुन देण्यासाठी मदत व पुर्नवसन मंत्री ना. मकरंद (आबा) पाटील हे फलटण तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत.