स्थैर्य, दि.३: सेबीने मुकेश अंबानी व त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्येकी १५ व २५ कोटींचा दंड भरावा लागेल.
वृत्तांनुसार, नोव्हेंबर २००७ मधील शेअर्सच्या खरेदी-विक्री प्रकरणात मुकेश अंबानी व रिलायन्स इंडस्ट्रीजला दंड ठोठावला आहे. तेव्हा अंबानी यांच्या रिलायन्स पेट्रोलियम लिमिटेडच्या (आरपीएल) शेअर्सच्या खरेदी-विक्रीत घोटाळा करण्यात आला होता. त्याच्याही आधी मार्च २००८ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने आरपीएलचे ४.१ टक्के शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता. २००९ मध्येच आरपीएलचे आरआयएलमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते.