यशराज देसाई यांच्या ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ पुस्तकाचे विधानभवन येथे प्रकाशन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२३ । मुंबई । लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे सुपुत्र यशराज देसाई यांच्या ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकाचे आज विधानभवन येथे प्रकाशन करण्यात आले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.

याप्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार अनिल बाबर, भरत गोगावले, बालाजी कल्याणकार, भिमराव तापकीर, महेंद्र दळवी, अतिरिक्त मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकारी यांच्यासह एपीके प्रकाशनचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. यशराज यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. पुस्तक प्रकाशनानिमित्त सर्वांनी श्री. यशराज यांना शुभेच्छा दिल्या.

पुस्तकाविषयी

‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या इंग्रजी पुस्तकाच्या माध्यमातून आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जीवनाकडे पाहण्याच्या अनोख्या सम्यक दृष्टीचा परिचय सर्वांना होईल. मोबाइल, त्यावरील समाजमाध्यमे, त्यावरून लिखित तसेच ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात होणारा माहितीचा प्रचंड मारा यांनी एक आभासी जग तयार झाले आहे. आता प्रत्येक व्यक्ती हे आभासी जग आणि वास्तव जग असे दुहेरी जीवन जगताना दिसते. यात माणसाच्या खऱ्या भावभावना, त्याचे श्रेयस, त्याच्या इच्छा-आकांक्षा, मानवी नाती या साऱ्यांपुढे डिजिटल आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानाला सामोरे जाताना, आभासी आणि वास्तव जगातला तोल, बॅलन्स कसा सांभाळायचा, याचे एक संवेदनशील, अभ्यासू चिंतन ‘लिव्हिंग द ग्रेटर लाइफ’ या पुस्तकात मांडले आहे.

एपीके प्रकाशन यांनी पुस्तक प्रकाशित केले असून लवकरच ते ऍमेझॉन, किंडल आणि एपीके प्रकाशनच्या वेबसाईटवर आणि क्रॉसवर्ड स्टोअरवर उपलब्ध असेल.


Back to top button
Don`t copy text!