फलटण पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर; 3 SC, 4 OBC तर 11 OPEN; महिलांसाठी एकूण 9 जागा राखीव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । फलटण । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणार्या पंचायत समितींचा आरक्षण सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करण्यात आलेला होता. त्यानुसार फलटण पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले असून तालुक्यातील १८ पंचायत समिती गणामधील तीन गण हे अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आले आहेत त्यापैकी दोन गण हे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी तालुक्यातील एकूण चार गण राखीव करण्यात आलेले आहेत त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी दोन गण राखीव करण्यात आलेले आहेत. एकूण १८ गणांपैकी ७ गण हे राखीव झाल्याने ११ गण हे सर्वसाधारण खुले आहेत त्यापैकी ५ गण हे सर्वसाधारण महिलांसाठी खुले आहेत. एकूण १८ पंचायत समितीच्या गणांपैकी ११ गण हे महिलांसाठी राखीव करण्यात आलेले आहेत. त्यामुळे पंचायत समितीमध्ये आता महिलाराज दिसणार आहे.

फलटण पंचायत समितीची आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली फलटण नगरपरिषदेच्या नूतन सभागृहात संपन्न झाली. यावेळी तहसीलदार समीर यादव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह प्रमुख अधिकारी व सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरक्षण सोडत करताना प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी संजय गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार

फलटण तालुक्यामध्ये पंचायत समिती साठी एकूण 18 गण असणार आहेत.

गणानुसार आरक्षण गणामधील समाविष्ट असलेली गावे पुढील प्रमाणे

– पाडेगाव पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

पाडेगाव, परहर खु.।। (पुर्नवसित), कुसुर, मिरेवाडी, रावडी खु.।।, रावडी बु.।।, मुरूम, तडवळे, खराडेवाडी, डोंबाळवाडी, कोरेगाव

– तरडगाव पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

तरडगाव, कापडगाव, आरडगाव, विठ्ठलवाडी, माळेवाडी, शिंदेमाळ, काळज, चव्हाणवाडी

– साखरवाडी (पिंपळवाडी) पंचायत समिती गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग –

साखरवाडी (पिंपळवाडी), होळ, खामगाव

– जिंती पंचायत समिती गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला –

जिंती, फडतरवाडी, भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, निंभोरे

– सस्तेवाडी पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

सस्तेवाडी, धुळदेव, अलगुलेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर

– सांगवी पंचायत समिती गण – सर्वसाधारण महिला –

सांगवी, सोमंथळी, सोनगाव, सरडे

– विडणी पंचायत समिती गण – अनुसुचित जाती महिला –

विडणी, माझेरी (पुर्नवसित), सोनवडी खु.।।, सोनवडी बु.।।, पिंप्रद

– राजाळे पंचायत समिती गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला –

राजाळे, साठे, मठाचीवाडी, खटकेवस्ती, टाकळवाडे

– आसु पंचायत समिती गण – सर्वसाधारण महिला –

आसु, गोखळी, पवारवाडी, ढवळेवाडी (आसु), हणमंतवाडी, जाधववाडी (आसु), शिंदेनगर

– गुणवरे पंचायत समिती गण – नागरिकांचा मागास प्रवर्ग –

गुणवरे, मुंजवडी, निंबळक

– बरड पंचायत समिती गण – सर्वसाधारण महिला –

बरड, जावली, आंदरूड, कुरवली बु.।।, राजुरी

– दुधेबावी पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

दुधेबावी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोंबवाडी, वडले, भाडळी बु.।।, सासकल, तिरकवाडी, भाडळी खु.।।

– कोळकी पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

कोळकी, झिरपवाडी, ठाकुरकी, गोळेगाव (पुर्नवसित), जाधववाडी (फ)

– गिरवी पंचायत समिती गण – सर्वसाधारण महिला –

गिरवी, बोडकेवाडी, मिरेवाडी, दालवडी, निरगुडी, धुमाळवाडी, विंचुर्णी, उपळवे, दर्याचीवाडी, सावंतवाडी, जाधवनगर, वेळोशी

– वाठार निंबाळकर पंचायत समिती गण – अनुसुचित जाती –

वाठार निंबाळकर, गोळेवाडी (पुर्नवसित), तावडी, वाखरी, जोर (पुर्नवसित)

– सुरवडी पंचायत समिती गण – सर्वसाधारण महिला –

सुरवडी, खडकी, नांदल, घाडगेमळा, वडजल, काशीदवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), मुळीकवाडी, मिरगाव, फरांदवाडी, ऊळंब (पुर्नवसित)

– सासवड पंचायत समिती गण – सर्वसाधारण खुला –

सासवड, पिराचीवाडी, वडगाव, वाघोशी, कोर्हाळे, बिबी, आळजापुर, मलवडी, शेरेचीवाडी (ढ), घाडगेवाडी, कापशी, टाकोबाईचीवाडी

– हिंगणगाव पंचायत समिती गण – अनुसुचित जाती महिला –

हिंगणगाव, परहर बु.।। (पुर्नवसित), आदर्की बु.।।, आदर्की खु.।।, शेरेचीवाडी (हि), सालपे, तांबवे, चांभारवाडी


Back to top button
Don`t copy text!