अपघातातील मृत युवकाचे पार्थिव नातेवाईकांनी नेले शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर; कार चालकावर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ डिसेंबर २०२२ । सातारा । कूपर कॉलनी येथे स्कोडा आणि गुरुवारी रात्री झालेल्या अपघातात वसीम मुबारक कलाल हा युवक ठार झाला या युवकाचा बळी स्कोडाचालकाच्या बेजबाबदार ड्रायव्हिंग मुळे गेला असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी करत त्याचे पार्थिव शुक्रवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठेवल्याने एकच तणाव निर्माण झाला मृताच्या नातेवाईकांनी कारचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांना चांगले धारेवर धरले.

याबाबतची अधिक माहिती अशी कूपर कॉलनी परिसरात गुरुवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान वसीम कलाल हा दुचाकीवरून जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्कोडाचालकाने त्याला जोरदार धडक दिली या धडकेमध्ये वसीम गाडी बरोबर फरपटत जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती कलाल याच्या नातेवाईकांनी दिली यासंदर्भात संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पार्थिव थेट उत्तर कार्यासाठी नेण्याऐवजी ते थेट शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवल्याने एकच तणाव निर्माण झाला पोलीस आणि मृताचे नातेवाईक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.

पोलिसांनी संबंधित कारचालकावर कारवाई करतो असे आश्वासन दिले बराच वेळ नातेवाईकांचे समाधान होत नव्हते संबंधित कारचालक हा मध्य प्राशन केलेला होता त्याच्या चुकीच्या गाडी चालवण्यामुळेच आमच्या नातेवाईकाचा बळी गेल्याचा आरोप संबंधितांनी केला या प्रकरणात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी लक्ष घालून संबंधित जमावाला शांत केले आणि स्कोडाचालकावर कठोर कारवाई केली जाईल त्याची काळजी करू नये असे आश्वासन दिले त्यामुळे तणाव निवळला.


Back to top button
Don`t copy text!