स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही. आयुष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर, नाती अतूट राहतील व जपता येतील.
समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका. रक्ताची नाती किती ही तोडली तरी चिखलात पाणी असते तसेच नात अबाधित राहते. नात्या नात्यात गैरसमजाने बरेच रामायण महाभारत घडते. आपली भूमिका नेहमी समजदारपणा, नम्रपणा, लवचिकता, मागे सरण्याची तयारी, मिटवणे या भूमिका चोख बजवल्यावर नाती शाबूत राहतात.
कधीही गैरसमज करून नात तोडू नका. कधी नात्यात अबोल आल्यास बोलून मन मोकळे करावे. भांडावे, हसावे, बोलावे पण नाते जोडावे. मानलेली व रक्ताची नाती जोडावी. आपल नातं समाज, धर्म, संस्कृती, न्याय, समता, बंधूता याबरोबर वैश्विक असावे. आपले परके असा भेदभाव न करता आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता नाते तयाचिया .