मुख्यमंत्र्यांया बंगल्याची रेकी:उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्यांच्या एटीएसने आवळल्या मुसक्या


स्थैर्य, मुंबई, दि.९: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाला उडवण्याची धमकी फोनवरुन मिळाली होती. हा फोन दुबईवरुन आल्याची माहिती होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या फार्म हाऊसची रेकी करणाऱ्या 3-4 जणांना मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने(ATS)ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील खालापूर तालुक्यातील भिलवले येथे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाउसवर मगंळवारी सायंकाळी टुरीस्ट कारने आलेल्या 3-4 जणांनी रेकी केली. फार्म हाऊसच्या गेटवरील सुरक्षारक्षकांकडे विचारपूस करण्यात आली. घटनेचे प्रसंगावधान राखून सुरक्षारक्षकांनी गाडी नबंर नोट करुन तात्काळ मुबंई पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुबंई एटीएसने नवी मुबंई टोल नाक्यावर रेकी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. सध्या त्यांची एटीएसकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर फार्महाऊसवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!