कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधीत मौजे वेळे ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । मुंबई । कोयना वन्यजीव प्रकल्पातील बाधीत  मौजे वेळे ग्रामस्थांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे.ग्रामस्थांनी  पुनर्वसनाच्या अनुषंगाने केलेल्या मागणीनुसार कार्यान्वयीन यंत्रणांकडून तात्काळ कार्यवाही  करण्यात येईल, असे  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात सातारा जिल्ह्यातील  कोयना वन्यजीव प्रकल्पातील प्रकल्पबाधीत लोकांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. या बैठकील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते.या बैठकीला प्रधानसचिव मदत व पुनर्वसन असिमकुमार गुप्ता,डॉ.जितेंद्र दहाडे, अमोल पवार, दिपक कांबळे, चंद्रकांत कांबळे, रामचंद्र पाटील तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे सातारा उपजिल्हाधिकारीकोल्हापूर  वन विभागाचे  मुख्य वनंसरक्षक समाधान चव्हाण, अलिबाग, साताराचे उपवनसंरक्षकही या बैठकीला उपस्थित होते.

मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार म्हणालेमौजे वेळे(ता. जावली)(जि. सातारा) येथील कोयना वन्यजीव – अभयारण्य प्रकल्पासाठी शासनाने जमीन संपादित केलेली  आहे. मौजे वेळे  ग्रामस्थांनी  रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात त्यांच्या पसंतीची जमिनीची मागणी केली आहे.तरी कोल्हापूर,अलिबाग तसेच सातारा जिल्ह्याचे पुनर्वसन अधिकारी व वन विभागाच्या अधिका-यांनी या प्रकरणाचा तात्काळ निपटारा करून ग्रामस्थांना त्यांच्या मागणीनुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून  पुनर्वसनाची कार्यवाही  करावी, अशा सूचना श्री.वडेट्टीवार यांनी केल्या.


Back to top button
Don`t copy text!