दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । सातारा शहरांमध्ये वाहतूक सुविधांच्या अभावामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे मार्च एंड समोर ठेवून होणाऱ्या पावत्या थोड्याशा बाजूला ठेवा पण वाहतूक कोंडीचे अधिनियमन करा अशा स्पष्ट कानपिचक्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाहतूक विभागाला दिल्या तसेच पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या क्रेनवर असणाऱ्या मुलांनी महिलांशी सौजन्याने बोलावे विनाकारण वादावादी तून पोलिसांची पोलिसांची प्रतिमा खराब होत आहे असेही आमदार श्री नरसिंह राजे यांनी निर्देशित केले.
वाहतूक सल्लागार समितीच्या सदस्यांची सातारा नगरपालिकेच्या दालनामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अविनाश कदम, शेखर मोरे सल्लागार समितीचे समन्वयक प्रकाश कडून नरेंद्र पाटील ,प्रशासक अभिजीत बापट , अमोल मोहिते, अविनाश कदम इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाहतूक समस्यांचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ उपायोजना सुचवल्या .सातारा शहरांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे त्यामुळे सातारा पोलिसांनी यथाशक्ती प्रथम वाहतुकीचे नियमन करावे वाहतुकीची कोंडी वर्दळीच्या सर्व चौकात होत आहे त्यामुळे मार्च पावत्यांचे टार्गेट बाजूला ठेवून वाहतूक व्यवस्थेवर लक्ष देण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या .पोवई नाक्यावरील रिक्षा स्टॉपचे आरटीओ च्या निर्देशाप्रमाणे नियमनं करावे, पोलीस दलातर्फे क्रेनची सुविधा सातारा शहराला दिली जाते मात्र पार्किंग पट्ट्या अभावी कधी कधी चुकून नो पार्किंग झोन मध्ये सुद्धा गाड्या लावल्या जातात त्यामुळे त्याविषयी पोलिसांनी सबुरीचे धोरण ठेवावे आधी प्रबोधन आणि मग कारवाई असे थोडेसे धोरण ठेवल्यास वादावादी होणार नाही क्रेन वर काम करणाऱ्या मुलांनी महिलांची सौजन्याने बोलावे त्यांना सहकार्य करावे विनाकारण वादावादी मुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असते. वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आणि नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही .
याशिवाय हॉकर्स झोनचे नियमन त्याचबरोबर लांब पल्ल्यांच्या एसटीसाठी सातारा शहराबाहेर स्वतंत्र जागा देण्यासंदर्भात राज्य शासनाची चर्चा करणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले सातारा शहरात वेगवेगळे हॉकर्स झोनची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे हद्द वाढीच्या क्षेत्रातील रिकाम्या जागांवर तात्काळ आरक्षण पडून एखाद्या महत्त्वपूर्ण आरक्षणाच्या जागेवर स्वतंत्र स्टेडियम बनवले जावे यासाठी ही आरक्षण टाकणे गरजेचे आहे अशा महत्त्वपूर्ण सूचना शिवेंद्रसिंह राजे यांनी केल्या .
वाय सी कॉलेज समोरील रस्त्याचे रुंदीकरण नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या घोळामध्ये अडकले आहे हे रुंदीकरण तात्काळ करण्यात यावे यासाठी लागणारा निधी तयार असूनही केवळ तांत्रिक अडचणीमुळे हे काम लवकर होत नाही तसेच येथे ट्राफिक पोलिसांकडून वाहतुकीचे नियमन व्हावे अन्यथा विद्यार्थ्यांना जीवाला धोका होणार नाही असे ते म्हणाले वाहतूक सल्लागार समितीचे समन्वयक प्रकाश गवळी यांनी सुद्धा महत्त्वपूर्ण सूचना केल्या ट्रक टर्मिनस तसेच एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यांना वाहतूक सुविधा याशिवाय सातारा शहरांमध्ये बाजारपेठांमध्ये सम विषम वाहतुकीच्या पार्किंग बरोबर जड वाहतुकीच्या गाड्यांना स्वतंत्र जागा देण्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या नरेंद्र पाटील यांनी सुद्धा सातारा शहरात येणाऱ्या एसटीमुळे वाहतुकीची कोंडी सतत होत असते त्यामुळे एसटी महामंडळाच्या आगारातील पूर्व दिशेला आऊट गेट करून तेथूनच एसटी बाहेर काढल्या जाव्यात अशा सूचना केल्या याशिवाय नगरपालिकेच्या प्रशासक या नात्याने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना नगरपालिकेच्या वतीने जे जे करणे शक्य आहे त्या शक्यतो सर्व सुविधा नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या जाव्यात अशी सूचना आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनी केली.