शेततळ्यास प्लास्टीक फिल्म पुरविणाऱ्या वितरक-विक्रेत्यांना नोंदणी बंधनकारक वितरक-विक्रेत्यांना नोंदणी करण्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेततळ्यास अस्तरीकरण व सामुहिक तलाव या घटकांसाठी  राज्यस्तरीय कार्यालयात नोंदंणी झालेल्या प्लास्टीक फिल्म पुरवठादार कंपन्याचे विक्रेते व वितरकांनी 30 डिसेंबर 2022 पर्यंत जिल्हास्तरावर नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी कळविले आहे.

नोंदणीसाठीच्या अर्जाचा नमुना तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय येथे उपलब्ध आहे. अर्जासोबत 100/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचे दोन लाख रुपयांचे मुळ हमीपत्र (बँक गॅरंटी) व एक छायांकित  प्रत, 100/- रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील नोंदणीच्या अटी व शर्तीबाबत करारनामा, मान्यता प्राप्त कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, वितरक व उत्पादक कंपनी यांच्यातील करारनाम्याची साक्षांकित प्रत, वितरक दुकान स्थळ/ जागेचा पुरावा, 8अ/ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मालमत्ता पत्रक, दुकान भाड्याने असल्यास भाडेकरार, दुकान नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, आधारकार्ड, बँक पासबूकची छायांकित  प्रत इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक असल्याचेही श्री. राऊत यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!