कोविड-19 मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार सानुग्रह अनुदानाबाबत ऑनलाईन अर्ज करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । सातारा । कोविड-19 मुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्जदारास अर्ज करताना  अडचणी येवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने अर्ज करण्याची नियमावली जाहीर केली आहे. अर्ज करण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास 1077 हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

अर्ज करताना करावयाची कार्यवाही खालीलप्रमाणे.

 1)    अर्जदार यांनी स्वता:चे आधारकार्ड वाचता येईल असे सुस्पष्ट स्वरुपात स्कॅन करुन अपलोड करणे  बंधनकारक आहे.

2)     अर्जदार यांचे स्वत:चे बॅक माहिती (रद्द चेक किंवा पासबुकाच्या पहिले पान) ज्यावर खातेदाराचे नाव, खाते नंबर व आयएफएससी कोड नंबर नमुद असलेला पुरावा वाचता येईल असे सुस्पष्ट स्वरुपात स्कॅन करुन अपलोड करणे बंधनकारक आहे.

3)    कोविड-19 मुळे मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्युचा दाखला जोडणे बंधनकारक आहे. (सदर व्यक्ती सातारा जिल्हयामध्ये मयत असणे आवश्यक आहे. एखादी व्यक्ती दुस-या जिल्हामध्ये मयत असल्यास ज्या जिल्हयामध्ये मयत आहे त्या ठिकाणी अर्जदार यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.)

4)    एम सी सी डी सर्टिफिकेट (वैदयकीय मृत्युचे कारण नमुद असलेले प्रमाणपत्र) हे शासनाच्या विहीत नमुना 4 किंवा 4 अ मध्ये असणे बंधनकारक आहे. सदरचे सर्टिफिकेट हे ज्या हॉस्पीटल मध्ये मयत आहे तेथून उपलब्ध करुन घेणेत यावे. सदरचा पुरावा वाचता येईल असे सुस्पष्ट स्वरुपात स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे.

5)    अर्जदार हा मयत व्यक्तीचा वर्ग – 1 चा वारस असणे आवश्यक आहे. (उदा. मुलगा, अविवाहीत मुलगी, आई, वडील, पती, पत्नी)

6)    मयत व्यक्तीस वरील वर्ग-1 चे वारस नसल्यास अर्जदार यांनी वारसाचा पुरावा वाचता येईल असे सुस्पष्ट स्वरुपात स्कॅन करुन अपलोड करणे आवश्यक आहे. (वारस फेरफार, कोर्टाकडून वारस सिद्ध केलेबाबतचा आदेश इ.)

7)    Applicant name  येथे अर्जदार यांचे नाव अर्जात नमुद करावे. Deceased Person च्या पुढील कॉलममध्ये Name असे नमुद आहे तेथे मयत व्यक्तीचे नाव नमुद करणे आवश्यक आहे व ऑनलाईन अर्ज संपुर्ण भरणे आवश्यक आहे.

8)        एखादया व्यक्तीचा अर्ज आवश्यक कागदपत्रांअभावी नामंजूर झालेला असल्यास mahacovid19relief.in या वेबसाईडवर जाऊन Satus या ऑपशनमध्ये जाऊन अर्जदार यांनी पुर्वी केलेला अर्ज डिलीट करणेचा आहे.

9)        सदरचा अर्ज डिलीट केलेनंतर पुन्हा अर्ज करताना पुर्वी अर्ज केलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त घरातील इतर व्यक्तीच्या नावे अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. तसेच पुर्वीचा अर्जातील मोबाईल नंबर नमूद न करता घरातील इतर मोबाईल नंबर नमुद करणेत यावा. तसेच अर्जदार यांनी वरील 1 ते 7 मुद्दयाची पुर्तता करणे आवश्यक आहे.


Back to top button
Don`t copy text!