मुंबई – बडोदा हायवे व वाढवण बंदर प्रकल्पाबाबत आ. निकोले यांनी विधान भवन दणाणून सोडले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी मुंबई – बडोदा सुपरफास्ट हायवे व वाढवण बंदर प्रकल्पाबाबत विरोधात जोरदार घोषणा देऊन विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला.

यावेळी आ. निकोले म्हणाले की, पालघर जिल्ह्यात विशेषतः डहाणू व तलासरी मधून विविध प्रकल्प जात असून येथील स्थानिक आदिवासी पुन्हा – पुन्हा विस्थापित होत आहे तसेच गेल्या 2 – 3 पिढी जो शेतकरी जमीन कसत व या प्रकल्पांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याना मोबदला हा मिळालाच पाहिजे. पण, असे न होता गुजरात किंवा मुंबई येथे राहणाऱ्या सावकारांना मोबदला मिळत आहे. हा कसणाऱ्या शेतकरी वर्गावर घोर अन्याय आहे. आमच्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांना महसूल अधिकारी – कर्मचारी कार्यालयातून धुडकावून लावत आहेत, तर याच कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून दलाल आमच्या शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आहे. हा सुळसुळाट थांबलाच पाहिजे.

दरम्यान माकप आमदार कॉ. विनोद निकोले यांनी डहाणूतील जनतेला उध्वस्त करणारे वाढवण बंदर रद्द करा !, मुंबई-बडोदा सुफरफास्ट हायवे, रेल्वे फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामध्ये भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्या !, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करा !, वनाधिकार कायदा आणि पेसा कायद्याची कसोशीने अंमलबजावणी करा !, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची ! अशाप्रकारच्या जोरदार घोषणा विधानभवन पायऱ्यांवर देऊन प्रभावी आंदोलन केले.

याप्रसंगी शिवसेना आमदार सचिन अहिर, आ. सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला. 


Back to top button
Don`t copy text!