दैनिक स्थैर्य । दि. ६ जुलै २०२१ । फलटण । फलटण शहरास पाणी पुरवठा करणारा निरा उजवा कालवा दिनांक 15 जुलै 2021 पर्यंत बंद राहणार असल्याने फलटण शहरात होणार्या पाणी पुरवठ्यामध्ये 30% कपात करण्यात येत असल्याचे फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी कळवले आहे.
या पाणी कपातीची नोंद सर्व नागरिकांनी घेवून फलटण नगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.