
दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । सातारा। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात गुरुवारी (ता. 26) आगमन होणार आहे. या सोहळ्याचा जिल्ह्यात चार दिवसांचा मुक्काम राहणार आहे. या कालावधीत वारकर्यांच्या सेवेसाठी लालपरी सज्ज होत असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या वतीने 96 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. वारकर्यांची गर्दी लक्षात घेता विविध मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत.
माउलींचा पालखी सोहळ्याचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड असा होणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकर्यांची गर्दी लक्षात घेता सातारा विभागातील विविध आगारांमार्फत 26 ते 29 जून या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत.
सातारा आगार 12 जादा बस, कर्हाड तीन, कोरेगाव चार, फलटण 28, वाई 10, पाटण तीन, दहिवडी 10, महाबळेश्वर तीन, मेढा सात, पारगाव खंडाळा12 व वडूज आगारातून 10 अशा एकूण 102 बस विविध मार्गांवर धावणार आहेत. पालखी मार्गावरील यात्रेच्या बसची तपासणी पथकामार्फत करण्यात येणार आहे. सुरक्षा व दक्षता अधिकार्यांकडून पोलिस खात्याशी संवादसाधून विविध मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, पालखीच्या मुक्कामी ठिकाणी लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे वाहतुकीच्या योग्य नियोजनासाठी एसटीचे वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक अशा सुमारे 41 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी थ् येणार्या वारकर्यांची गैरसोय टाळण्यासा जादा बस सोडण्यात येणार आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी पालखी तळावर अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती केली असून, जादा बससेवेचा वारकर्यांनी लाभ घ्यावा.
– रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, सातारा.
अशा राहणार एसटी फेर्या
- लोणंद- सातारा- लोणंद मार्ग ………….. .28
खंडाळा – शिरवळ – लोणंद ………..8 - लोणंद- फलटण ………………………..8
- लोणंद- फलटण- पंढरपूर- शिंगणापूर ……………..24
- शिंगणापूर- लोणंद …………………..6
- लोणंद- मोर्वे- खंडाळा ……………………6
- लोणंद- अहिरे-खंडाळा ……………..6