
मातीशी खेळ असणाऱ्या कुस्तीला ग्रामस्थांनी प्रोत्साहन व सहकार्य करा :- महाराष्ट्र केसरी पै.बाला रफिक शेख
२०१८ चे महाराष्ट्र केसरी गदेचे मानकरी पै.बाला रफिक शेख यांची पिंपोडे बुद्रुक येथे सदिच्छा भेट
स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. ५ : पै. बाला रफिक शेख म्हंटल की २०१८ चे महाराष्ट्र केसरीचे जालन्याचे मैदान गाजवणारा मल्ल ! माती विभागातून बाला रफिक तर मेटच्या विभागात तरबेज असणाऱ्या दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पदाचा दावेदार असणाऱ्या पै.अभिजीत कटके या मल्लावर मात करत ६२ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा किताब व गदेवर मोहर उमटवणारा व मूळचा खडकी सोलापूर जिल्हयाचा,सराव केला पुण्याला तर बुलडाण्याचे प्रतिनिधीत्व करणारा,सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या पै.बाला रफिक यांची पिंपोडे क्रिडा नगरीत ग्रामस्थ आणि क्रिडा असोसिएशनच्यावतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.या प्रसंगी बोलतांना माझ्या यशात अनेक व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या मातीशी खेळ असणाऱ्या कुस्तीमध्ये जिद्द, मेहनत आणि अथक परिश्रम घेऊन,सहकाऱ्यांच्या साथीने, वस्ताद,थोरामोठ्यांच्या, आशीर्वादाने इथ पर्यंत पोहचलो आहे.ही महाराष्ट्र केसरीची गदा माझे गुरुवर्य हिंद केसरी स्व.पै.गणपतराव आदळकर यांना मी समर्पित केली आहे. माझ्या यशात गणेश घुले,बळीराम शिंदे,शामल शिंदे,आ.नारायण पाटील सह अनेक लोकांचे योगदान आहे.महाराष्ट्रातील तमाम मल्लानी मेहनतीला महत्व द्या,परमेश्वर सदैव आपल्या पाठीशी उभा राहील.या लालमातीच्या खेळाला व विद्येला ग्रामस्थांनी प्रोत्साहन, पाठबळ, सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात कुस्ती टिकवायची असेल तर गावागावांतील तालीम व खेळ जिवंत राहिला पाहिजे असे मत २०१८ चा महाराष्ट्र केसरीचा मानकरी पै.बाला रफिक शेख यांनी मत व्यक्त केले.
पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगाव येथे पै.बाला रफिक शेख यांचा ग्रामस्थ,कुस्ती शौकीन व पिंपोडे जिमखाना असोसिएशन यांच्यावतीने फेटा, शाल, श्रीफळ, बुके देऊन स्वागत करण्यास आले. यावेळी सातारा जिल्हा कुस्ती संघटना महिला संघटकपदी व कोरेगाव तालुका कुस्ती महिला अध्यक्षपदी अफरोज इनामदार व राष्ट्रीय कुस्तीपटू दाऊद इनामदार याने दहावीत ९० टक्के गुण मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच नैनेश कांबळे, भूजल विभाग तांत्रिक अधिकारी महेश मोहटकर, सुलतानभाई इनामदार, शानूभाई इनामदार, माजी उपसरपंच अर्जुन साळुंखे, जिमखाना असोसिएशनचे सचिव सचिन लेंभे (सर), पै. दिगंबर निकम, रणजित लेंभे, अभिजीत लेंभे, पै. रणजित लेंभे, पै. गफूर इनामदार, पै. मनोज चव्हाण, भास्कर सुतार, रामदास पवार, अभिषेक नाचण, सतीश पवार, साहिल इनामदार, शुभम निकम, हरेश चव्हाण, आझाद इनामदार क्रिडा प्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.