दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२३ । मुंबई । टीमलीज एज्युटेक या भारताच्या आघाडीच्या शिक्षण आणि रोजगारयोग्यता उपाययोजना पुरवठादाराने आपल्या व्यापक करियर आऊटलुक रिपोर्ट २०२३ चे प्रकाशन केले असून त्यातून फ्रेशर्ससाठी नोकरीच्या बाजारपेठेतील स्वारस्यपूर्ण माहिती दिसून आली आहे. भारतात फ्रेशर्सच्या नेमणूकीत आर्थिक वर्ष २०२३ च्या दुस-या सहामाहीत आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ३ टक्के वाढ झाली आहे (६२ टक्क्यांवरून ६५ टक्के). याशिवाय, नोकरी शोधणाऱ्यांसाठी नेमणूकीच्या एकूणच दृष्टीकोनात याच कालावधीत ६८ टक्क्यांवरून ७३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ही सातत्यपूर्ण वाढ म्हणजे आगामी महिन्यात, विशेषतः फ्रेशर्ससाठी आशावादी नोकरीची बाजारपेठ होय.
अहवालानुसार, फ्रेशर्सच्या नेमणूकीचे सर्वाधिक उद्दिष्ट असलेल्या पहिल्या तीन क्रमांकाच्या उद्योगांमध्ये ई वाणिज्य आणि तंत्रज्ञान स्टार्टअप्स (५९ टक्के), टेलिकम्युनिकेशन्स (५३ टक्के), आणि अभियांत्रिकी व पायाभूत सुविधा (५० टक्के) या आहेत. आयटी उद्योगात एचवाय१ २०२३ च्या तुलनेत फ्रेशर्सच्या नेमणूकीचे उद्दिष्ट कमी झाले आहे (एचवाय२ २०२३ मध्ये ४९ टक्के आणि एचवाय१ २०२३ मध्ये ६७ टक्के – १८ टक्क्यांची घट). त्याचवेळी प्रवास आणि आतिथ्यासारख्या काही नवीन आणि ट्रेंडिंग क्षेत्रांमध्ये साधारण ५ टक्के वाढ (एचवाय२ २०२३ विरूद्ध एचवाय१ २०२३) झाल्याचे दिसते.
टीमलीज एज्युटेकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज म्हणाले की, “नेमणूकीच्या आव्हानात्मक वातावरणात भारतीय नोकरीच्या बाजारपेठेत फ्रेशर्सच्या नेमणूकीच्या उद्दिष्टात ३ टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे थोडासा चढ दिसून येऊ लागला आहे. याशिवाय, सर्व नोकरी शोधणाऱ्यांच्या वर्गवारीत एकूण ७३ टक्क्यांची वाढ झाल्यामुळे आगामी महिन्यांत सकारात्मक बाबी घडतील असे दिसते. पर्यटन आणि आतिथ्याच्या नवीन आणि ट्रेंडिंग क्षेत्रांचा उदय पाहणे जास्त प्रोत्साहक आहे, कारण या क्षेत्रांत आर्थिक वर्ष २०२३ च्या एचवाय२ मध्ये नेमणूकीच्या हेतूत ५ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय डेव्हओप्स इंजिनीअर, चार्टर्ड अकाऊंटंट, एसईओ एनालिस्ट, सायबरसिक्युरिटी एनालिस्ट, डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स इंजिनीयर आणि यूएक्स डिझायनर अशा विविध क्षेत्रांमधील मागणीमुळे नोकरीच्या बाजारपेठेत येणाऱ्या तरूण टॅलेंटसाठी मोठ्या संधी दिसून येतात.”
डेव्हओप्स इंजिनीयर, चार्टर्ड अकाऊंटंट, एसईओ एनालिस्ट आणि यूएक्स डिझायनर यांच्यासारख्या जबाबदाऱ्यांना फ्रेशर्ससाठीच्या उद्योगांमध्ये मोठी मागणी आहे. विविध शहरांच्या तुलनेत बंगळुरू ६५ टक्क्यांनी नेमणूकीच्या हेतूत वाढ होऊन आघाडीवर असून एचवाय१ २०२३ मध्ये ही १० टक्के घट झाली होती. त्यापाठोपाठ मुंबईत ६१ टक्के आणि चेन्नईमध्ये ४७ टक्के असून या दोन्ही शहरांमध्ये एचवाय१ च्या तुलनेत ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. दिल्ली ४३ टक्क्यांवर असून एचवाय१ २०२३ पासून ४ टक्के घट झाली आहे. नवीन टॅलेंटच्या मागणीत तुलनेने वाढ झाली असली तरी भारतीय फ्रेशर्सच्या नोकरीच्या बाजारपेठेत सध्याच्या एचवाय (जुलै डिसेंबर २०२३) मध्ये मागील एचवाय (जुलै-डिसें २०२२)च्या तुलनेत ६ टक्के वाढ झाली आहे.
बाजारातील सुस्पष्ट भावनांचे प्रतिबिंब दर्शवणारे आणि फ्रेशर्सना करता येतील असे सध्याचे मागणीतील अभ्यासक्रम त्यांची रोजगारयोग्यता वाढवू शकतात. त्यात सर्टिफिकेट कोर्सेस इन डिजिटल मार्केटिंग, बिझनेस कम्युनिकेशन, डेटा सायन्स, ब्लॉकचेन आणि एआय व एमएलमधील पीजी अभ्यासक्रम हे आहेत. या अहवालात आता डिग्री एप्रेंटसशिपवर एक नवीन विभाग समाविष्ट करण्यात आला आहे आणि त्याला विद्यार्थी व कंपन्यांमध्ये लोकप्रियता मिळू लागली आहे. याच कालावधीत डिग्री एप्रेंटिसशिपचे नियोजन करणाऱ्या सर्वोच्च तीन कंपन्या उत्पादन (१२ टक्के), इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (१० टक्के), आणि पॉवर अँड एनर्जी (७ टक्के) या आहेत. विविध शहरांमध्ये चेन्नई आणि पुणे प्रत्येकी १० टक्के वर तर बंगळुरू आणि मुंबई प्रत्येकी ९ टक्के तर अहमदाबाद हे शहर ७ टक्के वर आहे. या सर्वेक्षणातून भारतभरातील १८ विभागांमधील ७३७ लघु, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांना समाविष्ट करण्यात आले आहे. ही व्याप्ती १४ भौगोलिक प्रदेशांमध्ये पसरलेली असून [महानगरे, टायर-१, आणि टायर २] त्यातून नेमणूकीचे उद्दिष्ट प्रतिबिंबित झाले आहे.