दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण/फलटण २ प्रकल्पातील रिक्त मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया प्रकल्प कार्यालयामार्फत सुरू करण्यात येत आहे.
फलटण/फलटण २ प्रकल्पातील पुढील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायतीचे नाव अंगणवाडी केंद्राचे नाव रिक्त पदांची संख्या
काळज मुकादमवस्ती २३ मदतनीस – १
वडजल वडजल ०७ मदतनीस – १
वाखरी वाखरी ०७ मदतनीस – १
टाकुबाईचीवाडी टाकुबाईचीवाडी २१ मदतनीस – १
एकूण पदसंख्या – ४
वरील पदांच्या भरतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
१. विहीत नमुन्यातील अर्ज भरून देण्याचा दिनांक : ३१/०८/२०२३ ते ११/०९/२०२३ (कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून)
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय, पंचायत समिती, फलटण
२. प्राप्त अर्जांची छाननी – १२/०९/२०२३ ते १८/०९/२०२३
३. गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता घेणे – २०/०९/२०२३ ते ०५/१०/२०२३
४. प्राथमिक गुणवत्ता यादी (परिशिष्ठ ब) प्रसिध्द करणे, दि. ०६/१०/२०२३
५. प्राथमिक गुणवत्ता यादीवर हरकती घेणे व आक्षेप नोंदविणे दि. ०९/१०/२०२३ ते २०/१०/२०२३
६. अंतिम गुणवत्ता यादी (परिशिष्ठ ब) प्रसिध्द करणे, दि. २३/१०/२०२३
अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व फलटण २ कार्यालय, जुना सरकारी दवाखाना, रविवार पेठ, फलटण व संबंधित ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आवाहन केले आहे.