फलटण तालुक्यात रिक्त जागांवर अंगणवाडी सेविका / मदतनीस पदाची भरती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण प्रकल्पातील रिक्त अंगणवाडी सेविका / मदतनीस पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया प्रकल्प कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.

या ग्रामपंचायतनिहाय रिक्त अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची यादी –
प्रकल्प फलटण :
अंगणवाडी सेविका –
१) तिरकवाडी क्र. २४ २) ताथवडा – जाधववस्ती क्र. १४
मदतनीस –
१ ) शिंदेनगर-माळीमळा क्र. १६ २) मलवडी – कारंडेवस्ती क्र. ३४ ३) मलवडी – बरकडेवस्ती क्र. ३२ ४ ) सासवड- कोळेकरवस्ती क्र. २२ ५ ) सासवड – गायकवाडवस्ती क्र. २३ ६ ) घाडगेवाडी- अलगुडेवस्ती क्र. २९ ७) घाडगेवाडी- येळेवस्ती क्र.२८ ८) कापशी- कापशी क्र. २० ९) बरड – जाधववस्ती क्र. १ १० ) मिरढे – शिंदेवाडा क्र. १० ११) वडले – काळेवस्ती क्र. १७ १२) आंदरूड- जुनामळा क्र. २०१३) विंचूर्णी अहिवळेवस्ती क्र. १६ १४ ) वाठार निं. – जुना गांव क्र.२३ १५ ) वाठार निंबाळकर ढोकवस्ती क्र.२४ १६) दुधेबावी भवानीनगर क्र. ६ १७ ) भाडळी खु. पाटीलवस्ती क्र. १० – १८) सासकल-सासकल क्र.१२ १९) झिरपवाडी- झिरपवाडी क्र. २५ २०) कुरवली खु. – पिसाळवस्ती क्र. २३ २१) फरांदवाडी – म्हस्कोबामाळ क्र.१३ २२ ) ठाकुरकी-वाटारमळा क्र. १६ २३) झडकबाईचीवाडी-शिंदेवस्ती क्र. १६ २४ ) तरडफ – गोडसेवस्ती क्र. २० २५ ) सावंतवाडी – श्रीरामनगर क्र.२४ २६) वेळोशी- वेळोशी क्र. २२ २७) टाकोबाईचीवाडी – टाकोबाईचीवाडी क्र. २१

प्रकल्प फलटण –
सेविका –
१) विठ्ठलवाडी – विठ्ठलवाडी क्र. ३३ २) कापडगांव- कापडगांव क्र.११ ३) आरडगांव-आरडगांव क्र.१४
मदतनीस –
१ ) सोनगांव – लांडगेवस्ती क्र. २० २ ) काळज – मुकादममळा क्र.२३ ३) काळज – सावळापाटीलमळा क्र. २१ ४ ) चव्हाणवाडी- चव्हाणवाडी क्र. १२ ५) खराडेवाडी – आश्रमशाळा क्र. १८ ६ ) चांभारवाडी- चांभारवाडी क्र.२३ ७) जिंती – जिंती क्र. २१८) जिंती-जिंती क्र.२३ ९) फडतरवाडी – गरुडवस्ती क्र. १७ १०) रावडी खु. – लक्ष्मीनगर क्र. २

भरती कार्यक्रमाचा अंदाजे तपशील खालीलप्रमाणे :
१. विहीत नमुन्यातील अर्ज भरुन देण्याचा दिनांक:-५/२/२०२५ ते २८/२/२०२५ ( कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून ) अर्ज स्विकारण्याचे ठिकाण – बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती फलटण, फलटण
२. प्राप्त अर्जाची छाननी-२०/२/२०२५ ते २७/२/२०२५
३. गुणवत्ता पडताळणी समितीची मान्यता घेणे- दिनांक- २८/२/२०२५ ते ४/३/२०२५
४. नोटीस बोर्ड वरील प्रसिध्द यादितील उमेदवारा बाबत हरकती / अक्षेप / तक्रारी बाबत शहानिशा करुन गुणवत्ता यादित सुधारणा करणे दिनांक – ५/३/२०२५ ते १९/३/२०२५
५. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे दिनांक – २०/३/२०२५

अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी स्थानिक रहिवाशी आवश्यक असून दोन्ही पदासाठी वयोमर्यादा वय वर्ष १८ ते ३५ व विधवा उमेदवारासाठी कमाल ४० वर्षे राहील तसेच अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी किमान इ.१२ वी उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील. तरी तालुक्यातील संबंधित गावातील गरजू पात्र महिलांनी विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण कागदपत्रासह प्रकल्प कार्यालयाकडे दिलेल्या मुदतीत सादर करावेत. अपूर्ण भरलेला अर्ज तसेच यापुर्वी कार्यालयास सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही व मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा अथवा कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही. शासनाचे मार्गदर्शक सुचनानुसार उमेदवारांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन त्यांना शैक्षणिक पात्रतेसाठी कमाल ७५ गुण, विधवा / अनाथ यांचेसाठी कमाल १० गुण, व अनु जाती / जमातीसाठी १० गुण, विमुक्त, भ.ज.जा, इमाव, विमाप्र साठी कमाल ५ गुण देणेत येणार आहे. उमेदवारास त्याने दाखल केलेल्या कागदपत्रावरुन १०० गुणापैकी मिळालेल्या गुणांनुसार गुणानुक्रमे एका पात्र उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प फलटण व संबंधित ग्रामपंचायत येथे संपर्क साधावा. काही पदाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्यापदाची भरती रद्द करण्याचे अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे राखून असतील, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियांका गवळी यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!