दैनिक स्थैर्य । दि. १८ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर लाईट कनेक्शन कट करण्याचे काम सुरु महावितरणच्या माध्यमातून सुरु आहे. तरी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाईट बिल हे संबंधित कारखान्याच्या माध्यमातून वसूल करून ते महावितरणकडे भरण्यात यावेत, अशी योजना शेतकऱ्यांची सहमती घेऊन तातडीने फलटण तालुक्यात सुरु करण्यात यावी, असे स्पष्ट आदेश विधानपरिषदेचे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या अनुषंगाने मिटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील उर्फ दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, सौ. प्रतिभा धुमाळ यांच्यासह महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील बावडे, सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, फलटणचे कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले शेतीचे लाईटबील भरण्यासाठी कारखान्याला संमती पत्र देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील कारखान्यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचे लाईट बिल हे भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी आगामी काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपले लाईट बिल हे कारखान्याच्या माध्यमातून भरले जाईल, असे ही ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना कॅनॉलचे पाणी सोडल्यानंतर लाईट बिल न भरल्याने लाईट कट केल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी वारंवार होत आहेत. त्यासाठीच ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून महावितरणच्या लाईटबीलचा प्रश्न हा कारखान्याच्या माध्यमातून बिल भरून सोडवला जाईल, अशी खात्री यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना संबंधीत शेतकऱ्यांना लाईट बिल हे भरावेत लागणार आहे. जर लाईट बिलामध्ये काही अडचणी असतील तर त्या महावितरणच्या माध्यमातून सोडवण्यात येणार आहेत. आगामी काळामध्ये कारखान्याच्या माध्यमातून जर लाईट बिल भरली गेली तर संबंधित शेतकऱ्यावर लाईट बिल वेळेमध्ये भरण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील योजना प्रत्येक्षात उतरवण्यासाठी संमती द्यावी, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयीसाठी एक दिवस एक गाव हि योजना राबविण्यात येणार आहे. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार आगामी काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे लाईट बिल हे संबंधित कारखान्याच्या माध्यमातून भरण्याची सोया हि करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदरील योजनेचा लाभ उठवावा, असे मत बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील बावडे यांनी केलेले आहे.
यावळी फलटण तालुक्यातील विविध शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सभागृहामध्ये मांडल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.