दऱ्याच्यावाडीत एकरी ११४ टन ऊसाचे विक्रमी उत्पादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्टयातील दऱ्याचीवाडी म्हणजे कायम पाण्यासाठी वणवण, पण धोम – बलकवडी योजनेचे पाणी शिवारात आले आणि शेतकऱ्यांचे नशीबच बदलून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद, उत्साह, समाधानाचे वातावरण पसरले आहे.

दऱ्याच्यावाडीचे शेतकरी संदीप ज्ञानदेव कदम यांनी ऊस पीक घेण्यास सुरुवात केली, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय खतांचे योग्य नियोजन व झिरो बजेट शेतीच्या दृष्टीने नवनवीन प्रयोग केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी यावर्षी आपल्या शेतात २६५ जातीच्या ऊसाचे जोमदार पीक घेतले, त्यातून एकरी ११४ मे. टन ऊस उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे.
परिसरातील बरेच ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करुन यशस्वी शेती उत्पादन घेत आहेत. शरयु साखर कारखान्याचे चेअरमन श्रीनिवास पवार तथा बाप्पूसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक युगेंद्र पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली शरयु कारखाना परिसरातील शेतकऱ्यांसाठी लवकरच उत्कृष्ट ऊस बेणे उपलब्ध करुन देणार असून याचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी निश्चित फायदा होणार आहे.

संदीप कदम यांच्या फडावर शरयूचे संचालक अविनाश भापकर, केन मॅनेजर शशिकांत खलाटे व अनिल शिर्के यांनी भेट देऊन माहिती घेतली त्यांनी घेतलेली मेहनत व ऊसाचे एकरी उत्पादन पाहुन त्यांचे कौतुक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!