
दैनिक स्थैर्य । दि. 26 मे 2025 । फलटण । सितामाईच्या डोंगरात उगम पावणार्या बाणगंगा नदीला गेल्या अनेक वर्षात जेवढा पुर कधीही आला नसेल तेवढा रेकॉर्डब्रेक पुर हा यंदाच्या वर्षी आला असल्याचा अंदाज उपळवे गावचे माजी सरपंच सोपानराव जाधव यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जाधव म्हणाले की, बाणगंगा नदीचा उगम हा सतिामाईच्या डोंगरात होतो; त्यानंतर बाणगंगा नदी फलटण शहराच्या मार्गे पुढे जावुन निरा नदीला मिळते. तरी नदीकाठच्या सर्वच नागरिकांनी आपले घरातुन बाजुला जाउन पुराचे पाणी पोहचणार नाही; अश्या ठिकाणी मुक्काम करवा. जणेकरुन कोणतिही जीवीतहानी होणार नाही.