म्हसवड बाजारपेठेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


म्हसवड शहरातील गर्दीचे बोलके चित्र

स्थैर्य, म्हसवड दि.१६ : सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दि.१७ ते २७ जुलै या दिवसांकरीता पुन्हा एकदा संपुर्ण सातारा जिल्हा पुर्णतह: कडक असा लॉकडाउन करण्याचे जाहीर केले असल्याने पुढील १० दिवस घरी राहण्यासाठी म्हसवडकर नागरीक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणाबाहेर पडल्याचे चित्र दि.१६ रोजी दिसुन आले.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दररोज वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे, अशातच नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आहेत त्यामुळे कोरोनाचा शिरकांव सर्वत्र सुरु आहे. कोरोनाला रोखण्यासाठी यापुर्वीच शासनाने लोक ऐकणार नसतील तर पुन्हा लॉकडाउन करावे लागेल असे सुचीत केले होते. सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी सिंग यांनी संपुर्ण सातारा जिल्हाच पुन्हा एकदा १० दिवसांकरीता लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला असल्याने पुढील १० दिवस फक्त मेडीकल व हॉस्पिटल वगळता सर्व जिल्ह्यात सर्वकाही बंद राहणार आहे. त्यामुळेच पुढील १० दिवसांची सोय करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर म्हसवडकर नागरीक आज दि. १६ रोजी रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले.

दरम्यान पुढील १० दिवस कोणीही घराबाहेर पडु नये याकरीता म्हसवड पोलीस स्टेशन व म्हसवड नगरपरिषदेच्या वतीने शहरवासीयांना आवाहन करण्यात आले असुन कोणीही व्यावसायिकांनी पुढील १० दिवस आपली दुकाने उघडु नये असेही आवाहन करण्यात आले आहे.

दिलेल्या वेळेनंतरही शहरात दुकाने सुरुच –जिल्हा प्रशासनाने सकाळी ९ ते दुपारी २ अशी वेळ ठरवुन दिलेली असताना शहरातील काही धनदांडग्यांची दुकाने ही सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असतात याकडे पालिका जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सर्वसामान्य दुकानदारांकडुन केला जात आहे.

तोंड पाहुन कारवाई – सध्या पालिकेने दुपारी २ नंतर सुरु राहणार्या दुकानावर दंडात्मक कारवाईचा बडगा उभारला आहे, मात्र ही कारवाई करताना पालिका कर्मचारी आपला, जवळचा असे पाहुन कारवाई करीत असल्याने पालिका कर्मचार्यांच्या जवळच्यांची दुकाने मात्र ठरवुन दिलेल्या वेळेनंतरही सुरुच असल्याचे चित्र शहरात दिसुन येते.

साखळी तोडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे

जिल्ह्यासह संपुर्ण ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढु लागले असुन प्रशासनाने केलेल्या सुचनांकडे नागरीक दुर्लक्ष करीत असल्यानेच रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, कोरोनानाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरीकाने प्रशासनाने केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाला जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात यश मिळणार आहे त्यामुळेच प्रत्येक नागरीकाने प्रशासनाने केलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!