पर्यावरण संवर्धनाचे गांभीर्य ओळखा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मानवाची समृद्ध जीवनाकडील वाटचाल व पर्यावरण संवर्धनाची गरज ह्यांचा समन्वय ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

आज covid-19 जगभरात थैमान घातले आहे. मागील तीन महिने  प्रत्येक जण घरात बसला आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये करोना बचावासाठी योग्य ती आरोग्याची काळजी घेतली जात आहे. या आलेल्या महामारीच्या साथीने वेगवेगळे चढ-उतार व अनेक समीकरणं बदलत आहेत. मग त्यामध्ये अर्थव्यवस्था असो जीवनशैली असो वा दैनंदिन जीवनातील कामकाज, या प्रत्येकामध्ये या साथीच्या भीतीने लोकांना बदल करण्यास प्रवृत्त केले आहे. मानवी जीवनातील हे बदल पहात असताना इतर अनेक बदलांचा विचार करणेसुद्धा आवश्यक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने निसर्गचक्राचा विचार नक्कीच करणे आवश्यक आहे. शहरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून पक्ष्यांच्या किलबिलाटा पासून वंचित राहिलेल्या मानवजातीला आज सकाळ संध्याकाळ पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने मोहून टाकले आहे. दूर दूर वरून हिमालयातील बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली आहेत. आकाशातील चंद्र ताऱ्यांचा समूह पाहण्याचा एक वेगळाच आनंद लुटता येऊ लागला आहे. शहरालगत असलेल्या खाडी व समुद्रकिनारी अनेक  नवीन-नवीन पक्षी पाहायला मिळत आहे. पहिल्या पावसात इंद्रधनुष्य पाहण्याची संधी बऱ्याच वर्षांनी आली आहे. हे सर्व बदल अचानक कसे झालेत.

मानवाने आधुनिकरण साधत असताना निसर्गाच्या ऋतूचक्राकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

ऋतुचक्र बिघडण्यास कारणीभूत असणारे मोठ्या प्रमाणातील प्रदूषण ज्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक कारखाने व वाढत जाणारी वाहनांची संख्या, शहरीकरण, जंगलांचा र्हास अशा एक ना अनेक कारणांचा समावेश आहे. आज वातावरणात कार्ब वायूचे ( ग्रीन हाऊस गॅस)प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे जागतिक तापमानात मागील काही वर्षात चिंताजनक वाढ होत आहे.

अचानक येणारा पाऊस,वादळे, पूर, जंगलातील मोठ्- मोठ्या आगी ह्या सर्व बाबी ऋतुचक्र पूर्णतः ढासळत झाल़्याचे संकेत देत आहेत.

जागतिक तापमान वाढीचा विषय आज मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. तापमान वाढीच्या मुद्द्यावर १९२ देशांनी मिळून क्योटो करार केलेला आहे. १९९७ साली क्योटो, जपान येथे झालेल्या करारानुसार प्रगत राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात या वायूंच्या उत्सर्जनावर निर्बंध आणणे तसेच प्रगतशील व इतर राष्ट्रांनी आधुनिकरण साधताना कार्ब वायूचे प्रमाण नियंत्रणात आणने आवश्यक असल्याचे ठरवण्यात आले.

या करारानुसार 2008 ते 2012 या कालावधीत 36 देशांनी या वायूंचे नियंत्रण राखण्यात यश मिळवलं तर नऊ देशांनी नियंत्रण राखलं पण त्यांचं प्रमाण थोडं वाढला गेल. परंतु दुसऱ्या सत्रात २०१२ साली बऱ्याच या देशांनी विशेषतः प्रगत राष्ट्रांनी ह्या करारातून माघार घेतली. मागील वर्षी अमेरिकेने या करारातून माघार घेण्याचे ठरवले.

आज कर्बवायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करणारे अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश या विषयावर बोलण्यास तयार नाहीत.

मागील पन्नास वर्षाच्या तुलनेमध्ये कर्ब वायूचे प्रमाण मागील दहा वर्षात बावीस टक्क्यांनी वाढले आहे. तापमान वाढीमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित शिखरे वितळू लागली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे २००६ साली सागर पातळीत ३३.५४  मिलिमीटर इतकी वाढ झाली आणि त्यानंतर पुढील दहा वर्षात म्हणजे २०१६ साली त्यामध्ये  ४०.४७ मिमि इतकी वाढ होऊन ती ७४.४८ मिमि इतकी झाली आहे.

हे असेच चालत राहिले येणाऱ्या काही वर्षात समुद्रकिनाऱ्यापासून ३०किलोमीटर अंतरावरील शहर तसेच जगातील १०मोठे शहर पुराच्या अधिपत्याखाली येऊ शकतात.

मागील पन्नास वर्षाच्या तुलनेत २००६ साली ०.६३ सेल्सिअस इतके तापमान वाढ नोंदवली गेली व पुढील दहा वर्षात त्याच्यामध्ये वाढ होऊन तापमान ०.८७ नोंदवल गेल.जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहर येतात. मागील महिन्यात भर उन्हाळ्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल वादळ. तसेच तीन दिवसापूर्वी मुंबई-गुजरात किनारपट्टीवर थैमान घातलेल्या वादळचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे. तापमान वाढ आणि ऋतुचक्राचा समतोल बिघडत चाललेले अनेक संकेत आपल्याला मिळत आहेत.

मागील काही वर्षात पर्यावरण विषयक जागृती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. देशात सर्व पातळीवर पर्यावरण पूरक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत ही जरी समाधानाची बाब असली तरी आपण करत असलेले प्रयत्न हे फारच अत्यल्प असल्याची जाणीव सगळ्यांना होणे गरजेचे आहे.

निसर्ग वेगवेगळ्या आपत्तीद्वारे याचे संकेत देत आलेला आहे. करोना हादेखील त्याचाच एक भाग आहे असे म्हणावयास हरकत नाही.या कालावधीत आपण प्रदूषणमुक्त निसर्गाचा अनुभव घेत आहोत. आरोग्यविषयी संबंधित तक्रारी देखील फारच मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. निसर्गाच्या या साऱ्या संकेता मधून आपण धडा घेऊन निसर्ग संवर्धनासाठी योग्य अश्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवा. आजच्या आपल्या समृद्ध जीवनशैलीला असेच पुढे न्यावयाचे असल्यास आपण पर्यावरण संवर्धनाचा विषय गंभीरतेने घेणे आवश्यक आहे यातच राष्ट्राचं, जगाचा आणि संपूर्ण मनुष्यजातीचभविष्य आधारित आहे.

मानवाने आधुनिकरण साधत असताना निसर्गाच्या ऋतूचक्राकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे.

ऋतुचक्र बिघडण्यास कारणीभूत असणारे मोठ्या प्रमाणातील प्रदूषण ज्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक कारखाने व वाढत जाणारी वाहनांची संख्या, शहरीकरण, जंगलांचा र्हास अशा एक ना अनेक कारणांचा समावेश आहे. आज वातावरणात कार्ब वायूचे ( ग्रीन हाऊस गॅस)प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे जागतिक तापमानात मागील काही वर्षात चिंताजनक वाढ होत आहे.

अचानक येणारा पाऊस,वादळे, पूर, जंगलातील मोठ्- मोठ्या आगी ह्या सर्व बाबी ऋतुचक्र पूर्णतः ढासळत असल्याचे संकेत देत आहेत.

जागतिक तापमान वाढीचा विषय आज मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे. तापमान वाढीच्या मुद्द्यावर १९२ देशांनी मिळून क्योटो करार केलेला आहे. १९९७ साली क्योटो, जपान येथे झालेल्या करारानुसार प्रगत राष्ट्रांनी मोठ्या प्रमाणात या वायूंच्या उत्सर्जनावर निर्बंध आणणे तसेच प्रगतशील व इतर राष्ट्रांनी आधुनिकरण साधताना कार्ब वायूचे प्रमाण नियंत्रणात आणने आवश्यक असल्याचे ठरवण्यात आले.

या करारानुसार २००८ ते २०१२ या कालावधीत ३६ देशांनी या वायूंचे नियंत्रण राखण्यात यश मिळवलं तर नऊ देशांनी नियंत्रण राखलं पण त्यांचं प्रमाण थोडं वाढल गेल. परंतु दुसऱ्या सत्रात २०१२ साली बऱ्याच या देशांनी विशेषतः प्रगत राष्ट्रांनी ह्या करारातून माघार घेतली. मागील वर्षी अमेरिकेने या करारातून माघार घेण्याचे ठरवले.

आज कार्बवायू मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करणारे अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश या विषयावर बोलण्यास तयार नाहीत.

मागील पन्नास वर्षाच्या तुलनेत कार्ब वायूचे प्रमाण मागील दहा वर्षात बावीस टक्क्यांनी वाढले आहे. तापमान वाढीमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फाच्छादित शिखरे वितळू लागली आहेत. त्याचा परिणाम म्हणजे २००६ साली समुद्र  पातळीत ३३.५४  मिलिमीटर इतकी वाढ झाली आणि त्यानंतर पुढील दहा वर्षात म्हणजे २०१६ साली त्यामध्ये  ४०.४७ मिमि इतकी वाढ होऊन ती ७४.०१ मिमि इतकी झाली आहे.

हे असेच चालत राहिले तर येणाऱ्या काही वर्षात समुद्रकिनाऱ्यापासून ३०किलोमीटर अंतरावरील शहर तसेच जगातील १०मोठे शहरं पुराच्या अधिपत्याखाली येऊ शकतात.

मागील पन्नास वर्षाच्या तुलनेत २००६ साली ०.६३ सेल्सिअस इतके तापमान वाढ नोंदवली गेली व पुढील दहा वर्षात त्याच्यामध्ये वाढ होऊन तापमान ०.८७ नोंदवल गेल.जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात जगातील पहिल्या दहा शहरांमध्ये भारतातील चार शहर येतात. मागील महिन्यात भर उन्हाळ्यात ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये आलेल वादळ. तसेच तीन दिवसापूर्वी मुंबई-गुजरात किनारपट्टीवर थैमान घातलेल्या वादळचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे. तापमान वाढ आणि ऋतुचक्राचा समतोल बिघडत चाललेले अनेक संकेत आपल्याला मिळत आहेत.

मागील काही वर्षात पर्यावरण विषयक जागृती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. देशात सर्व पातळीवर पर्यावरण पूरक कार्यक्रम हाती घेतले जात आहेत ही जरी समाधानाची बाब असली तरी आपण करत असलेले प्रयत्न हे फारच अत्यल्प असल्याची जाणीव सगळ्यांना होणे गरजेचे आहे.

निसर्ग वेगवेगळ्या आपत्तीद्वारे याचे संकेत देत आलेला आहे. करोना हादेखील त्याचाच एक भाग आहे असे म्हणावयास हरकत नाही.या कालावधीत आपण प्रदूषणमुक्त निसर्गाचा अनुभव घेत आहोत. आरोग्यविषयी संबंधित तक्रारी देखील फारच मोठ्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत. निसर्गाच्या या साऱ्या संकेता मधून आपण धडा घेऊन निसर्ग संवर्धनासाठी योग्य अश्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवा. आजच्या आपल्या समृद्ध-जीवनशैलीला असेच पुढे न्यावयाचे असल्यास आपण पर्यावरण संवर्धनाचा विषय गंभीरतेने घेणे आवश्यक आहे यातच राष्ट्राचं, जगाचे आणि संपूर्ण मनुष्यजातीच भविष्य आधारित आहे.     

सुधीर (हेमंत )थोरवे

९९६७६४३५९९ (लेखक सुधीर थोरवे हे पर्यावरण तज्ञ असून रिलायन्स मध्ये कार्यरत आहेत.)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!