चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात नवकार महामंत्राचे पठण


दैनिक स्थैर्य । 10 एप्रिल 2025। फलटण । येथील जैन सोशल ग्रुप फलटण व श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 9 रोजी सकाळी आठ वाजता श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर येथे वकार महामंत्राचे पठण आयोजित करण्यात आले होते.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन(जितो) आणि जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन यांनी नवकार महामंत्राच्या पठणाबाबत आवाहन केले होते.

या कार्यक्रमांत श्रावक- श्राविका, युवक- युवती, संगिनी फोरम युवा फोरम, सन्मती महिला मंडळ व श्री चंद्रप्रभू युवक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जागतिक शांतता, मानव जातीच्या कल्याणासाठी नवकार महामंत्र पठणाचा कार्यक्रम संपूर्ण जगात आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास जिल्हा सत्र न्यायाधीश प्रवीण चतुर, ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, विशालभाई शहा, श्री चंद्र प्रभू मंदिराचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. श्री नवकार महामंत्राच्या पठणानंतर आरती करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!