लोकशाही दिनात 6 अर्ज प्राप्त


दैनिक स्थैर्य | दि. ०१ नोव्हेंबर २०२१ | सातारा | जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये आज  6  तक्रारी जनतेकडून प्राप्त   झाल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात  आयोजित केलेल्या लोकशाही दिनास पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांच्यासह  संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या अर्जामध्ये पोलीस विभाग 1, भूमि अभिलेख 2, विद्युत विभाग 1, नगर पालिका 1 व जिल्हा परिषदेकडील 1  अशा एकूण 6  तक्रार अर्जांचा समावेश आहे.


Back to top button
Don`t copy text!