महिला दिनानिमित्त रुईमध्ये महिलांचा यथोचित सन्मान


दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । बारामती । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रुई येथे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व जिल्हा परिषद शाळा मधील महिला शिक्षकांचा सन्मान करून महिला दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. सदर आयोजित कार्यक्रमात महिलांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेविका सुरेखा चौधर, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष नवनाथ चौधर, रुई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र चौधर, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेलचे उपाध्यक्ष प्रा. आजिनाथ चौधर, पांडुरंग चौधर, प्रमोद कांबळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

कु. रुपाली चौधर या विद्यार्थीनीने “महिला दिन व महिला कर्तृत्व” या विषयावर भाषण केले. आभार नवनाथ चौधर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!