दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२२ । सातारा । आजच्या शालेय जीवनातील मुलांनी मोबाईलच्या .आभासी युगामध्ये राहता कामा नये . त्यांनी वास्तवात जगायला शिकावे वास्तववादी जगणे हेच माणसाला अनुभवाच्या माध्यमातून समृद्ध करत असते असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी केले.
सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती 2023 यांच्यावतीने इथे घडतात वाचक वक्ते या कार्यक्रमांतर्गत इयत्ता 7 पाचवी ते दहावी गटांसाठी वक्तृत्व स्पर्धा जिल्हा ग्रंथालय सभागृह अजिंक्य कॉलनी येथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सुप्रिया जंगम परीक्षक सौ शुभांगी पोळ, संगीता बर्गे ,ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, कार्यवाहक शिरीषचिटणीस कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, समन्वयक सुनीता कदम, सह समन्वयक प्रल्हाद पार्टे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
खंदारे पुढे म्हणाले, ” पुस्तकातील लेखकांचे विचार आणि आपल्या आलेल्या अनुभवातून आलेले विचार यांची जोडणी होते त्यावेळेला नवीन विचार जन्माला येतो. विद्यार्थ्यांनी मोबाईल तंत्रज्ञान यांचे गॅझेट युग असले तरी प्रत्यक्ष वास्तववादी जीवन जगण्यात प्राधान्य द्यावे त्यामधून माणसाला समृद्धता येते समाजामध्ये आदर्श व्यक्तिमत्व ही पुस्तकाच्या व्यासंगातून मधूनच घडतात असे ते म्हणाले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले त्यांनी सर्व वाचक व्यक्ती यांना शुभेच्छा दिल्या वाचनाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते शालेय जीवनात समृद्ध अनुभवातून घडले हेच अनुभव विद्यार्थ्यांनाही समृद्ध करतात शहरीकरणाच्या रेट्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मोडकळीला आली आहे . अशावेळी पुस्तके वाचन हे विद्यार्थी दशेमध्ये संस्कार केंद्र झाले आहे त्यामुळे पुस्तके हे संस्कार पिठाची कामे कशी करतील याकडे लक्ष द्यायला हवे.
वाचन केल्यानंतर आत्म्याला जो आनंद होतो तो आत्मानंद असा आत्मानंद प्रत्येक वाचकाला आपल्या आवडीच्या पुस्तक वाचनातून मिळतो प्रत्येक विद्यार्थ्याने अवश्य एक पुस्तक वाचावे असा आग्रह डॉक्टर यशवंत पाटणे यांनी आपल्या मनोगतातून धरला या कार्यक्रमास साहेबराव होळकर, डॉ राजेंद्र माने सचिन माने, शुभम बल्लाळ, जगदीश खंडागळे, उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता कदम यांनी केले तर आभार प्रल्हाद पार्टे यांनी मानले.