
स्थैर्य, बारामती, दि. 14 ऑगस्ट : जीवनात केवळ पैसा कमावणे हा उद्देश नसून विविध क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीवेतून काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष संदीप चांदगुडे यांनी केले.
संदीप चांदगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोजुबावी, ता. बारामती येथील श्री सावतामाळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मतिमंद मुलांचे निवासी केंद्र येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व अत्यावश्यक वस्तूंचा वाटप करण्यात आले होते. यावेळी संदीप चांदगुडे बोलत होते
या प्रसंगी रुपाली राहुल जाधव व्यवस्थापक, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे उपाध्यक्ष प्रणव कानडे, सुनिल चांदगुडे, सुमित लोंढे, मयुर बनकर आदी उपस्थित होते. या मदतीबद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले