लोणंदच्या नर्मदा कॉम्प्युटर्सतर्फे विविध ग्रामसभांमध्ये ‘सारथी’ संस्थेच्या योजनांचे वाचन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात ‘सारथी’ हे महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या दुर्लक्षित गटासाठी सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरता विविध योजना राबवत आहे. या योजनांची माहिती गाव पातळीवर तळागाळापर्यंत पोहोचवावी, या हेतूने १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी विविध गावांमध्ये होणार्‍या ग्रामसभेमध्ये सारथी संस्थेच्या सर्व योजनांचे वाचन करण्याचा अभिनव उपक्रम करण्यात आला.

सारथी संस्थेच्या या अभिनव उपक्रमास प्रतिसाद म्हणून लोणंद येथील नर्मदा कॉम्प्युटर्स या संगणक प्रशिक्षण संस्थेमध्ये सारथीचा सुरू असलेला सी.एस.एम.एस. डी.इ.इ.पी. या डिप्लोमा कोर्सच्या प्रशिक्षणार्थींची यासाठी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली. या प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळ्या गावांमध्ये ग्रामपंचायतींमध्ये ध्वजवंदनानंतर होणार्‍या ग्रामसभांमध्ये सुरुवातीस या योजनांच्या माहितीचे वाचन केले व सारथी संस्थेमार्फत राबवल्या जाणार्‍या मोफत योजनांची माहिती उपस्थित लोकांना करून दिली.

या उपक्रमांतर्गत नर्मदा कॉम्प्युटर्सतर्फे प्रशिक्षणार्थी म्हणून कु. ऋतुजा शिंदे हिने तरडगाव, कु. सिद्धी भोईटे हिने चव्हाणवाडी, कु. रिद्धी कणसे हिने शेरीचीवाडी, कु. अबोली भोईटे हिने आरडगाव तसेच कु.स्वप्नाली खराडे हिने तडवळे या ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेमध्ये सारथी संस्थेच्या विविध योजनांचे वाचन केले.

या उपक्रमास आरएलसी समन्वयक अनिल गावंडे सर, एलएलसी समन्वयक विक्रम जाधव सर व पराग पारवे सर यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना नर्मदा कम्प्युटर्सच्या संचालिका सौ. प्रियांका निगडे मॅडम यांनी मोलाचे सहकार्य केले.


Back to top button
Don`t copy text!