
दैनिक स्थैर्य । दि. ०७ जुलै २०२२ । फलटण । सध्याच्या धावपळीच्या जगात वाचन संस्कृती लोप पावत असल्याचे चित्र दिसत आहे. गेली २ वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थी शाळेपासून दूर राहिल्याने पुस्तके आणि वाचन यापासून तो दूर गेला आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले तरी पुस्तके आणि वाचन संस्कृती यापासून तो दूर जाता कामा नये. विद्यार्थी व शिक्षक यांना आवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी साखरवाडी विद्यालय, माध्यमिक विभाग या मध्ये वाचन दिवस उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता ५ वी ते १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना आवांतर वाचनासाठी गोष्टीची पुस्तके वाटण्यात आली. शाळेच्या प्रांगणात बसून शिक्षक यांनी वाचनाचा आनंद घेतला. वाचन ही एक कला आहे. नित्याच्या वाचनाने ती परिपक्व होते आणि वाचनाच्या अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यामध्ये वाचनाची गोडी लागल्यास निश्चित मदत होईल. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्याध्यापिका सौ. उर्मिला जगदाळे व पर्यवेक्षक श्री. तुळशीदास बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल श्री. ननावरे विलास यांनी पार पाडला.
या उपक्रमाचे साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे – पाटील व सर्व संचालक यांनी अभिनंदन केले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचे सहकार्य मिळाले.