
दैनिक स्थैर्य । 12 जुलै 2025 । फलटण । येथील बौद्ध महासभेवतीने वर्षावासाचा प्रारंभ आजच्या आषाढ पौर्णिमेदिवशी करण्यात आला. प्रत्येक गावामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करावे असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे भिक्खू संघशासन राष्ट्रीय महासचिव भंते सुमेध बोधी यांनी केले. कुरवली खुर्द येथे वर्षावास प्रवचन मालिकेत ते बोलत होते.
यावेळी नालासोपारा येथून आणलेल्या धातूवर आधारित बनवण्यात आलेल्या स्तूपाचे पूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व सांगितले. भगवंताने पहिला धम्म उपदेश पंचवर्गीय भिक्खूंना केला. इ. स 528 ला संबोधी प्राप्तीनंतर भगवंतांनी पहिल्यांदा धम्माचा उपदेश केला. म्हणून या पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व आहे. बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावास केला जातो. आठव्या आठवड्यात गया ते सारनाथ प्रवास करून त्यांच्या प्रथम पाच शिष्यांना प्रथम धम्मदेसना दिली. वर्षावास हा केवळ धार्मिक विधी म्हणून न पाहता या काळामध्ये आत्म परिवर्तन, विवेक जागरणाचा काळ म्हणून पहावे. या काळात धम्माचे चिंतन, मनन, अभ्यास करून प्रज्ञा,शील,समाधी प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. रोज संध्याकाळ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सामुदायिक वाचन सुरू करावे.
यावेळी भंते सुमेध बोधी यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संघराज निकाळजे यांना भेट दिला. लक्ष्मण निकाळजे यांनी याठिकाणी ग्रंथालय सुरू करण्याचा संकल्प केला.
यावेळी बौद्ध महासभेचे पुणे जिल्हा व सातारा जिल्ह्याचे प्रभारी, राज्याचे संघटक, समता सैनिक दलाचे सहाय्य स्टाफ ऑफिसर, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य दादासाहेब भोसले, तालुकाध्यक्ष महावीर भालेराव, महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संस्कार विभागाचे सचिव बजरंग गायकवाड, संघटक विजयकुमार जगताप, हिशोब तपासणीस सतिश कांबळे, संरक्षण उपाध्यक्ष संपत भोसले, लक्ष्मण निकाळजे,आनंदराव निकाळजे, संघराज अहिवळे, झुंबर निकाळजे, शिलाबाई निकाळजे,सखूबाई जाधव, शाहिरा सय्यद, शारदा लोंढे, बाई जाधव, कविता जाधव, सत्यभामा जगताप, वालाबाई इंगळे, मंगला कदम, सुलोचना अहिवळे, लता अहिवळे, मोहिनी अहिवळे, उत्तम निकाळजे, फकक्ड सोनवणे, कमल अहिवळे, प्रभावती अहिवळे,निलाक्षी अहिवळे, वनिता अहिवळे, पूनम जगताप, पद्मा अहिवळे,प्रवीण इंगळे, विशाल अहिवळे, गणेश अहिवळे, पियुष अहिवले, अशोक निकाळजे, बाळासाहेब अहिवळे, राजेंद्र अहिवळे, साईबाबा अहिवळे,आबा अहिवळे, श्रीकांत अहिवळे, राजरत्न जगताप, अक्षरा जगताप, पायल जगताप, पुनम जगताप,पुर्वा जाधव, शौर्य इंगळे, स्वरा इंगळे,रुपाली इंगळे,करणं अहिवळे,सुभाष, अहिवळे , आकाश अहिवळे, अभिजित अहिवळे उपस्थित होते. बाबासाहेब जगताप यांनी सूत्रसंचालन केले.