
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व तालुक्यांच्या ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी नुकत्याच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी श्री पल्लम राजू यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी जाहीर केल्या यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष म्हणून महेंद्र सूर्यवंशी बेडके यांची फेरनिवड झाली व फलटण शहर अध्यक्ष म्हणून पंकज चंद्रकांत पवार यांचीही फेरनिवड झाली.
दि.2 जानेवारी 2023 रोजी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी येथे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक श्रीरंग चव्हाण पाटील व निखिल कविश्र्वर,जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्रे देण्यात आले.
यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व ब्लॉक कमिटींच्या कार्यकारिणी व सर्व सेलच्या नेमणूक नव्याने करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा काँग्रेस चे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.