दैनिक स्थैर्य । दि. १७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा फलटणच्या केंद्रप्रमुख पदी भालचंद्र ताथवडकर यांची फेरनियुक्ती एकमताने करण्यात आलेली आहे.
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था शाखा फलटणची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच प. पू. उपळेकर महाराज मंदिर हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शांताराम आवटे व नाशिक केंद्राचे निरीक्षक म्हणून चंद्रशेखर दाणी उपस्थित होते. यासह फलटण केंद्राचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फलटण केंद्राच्या केंद्रप्रमुखांची निवड करून नंतर केंद्रप्रमुख उर्वरित पदाधिकाऱ्यांची निवड करतील अशी माहिती सचिव अनिरुद्ध रानडे यांनी दिली.
यावेळी गेली ६ वर्ष केंद्रप्रमुख म्हणून काम करत असताना आपल्याला सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यथोचित सन्मान ताथवडकर यांनी केला. आगामी काळामध्ये सुद्धा सर्वांना सोबत घेऊन आपण कामकाज करू असे आश्वासन ताथवडकर यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांनी भालचंद्र ताथवडकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिरुद्ध रानडे यांनी मानले.